Uncategorized

आढळरावांकडून शिरूरमधील विकासकामांची पाहणी; निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}म्हाडाचे सभापती तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या पाठपुराव्यातून शिरूर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामांच्या गुणवत्तेबाबत आवश्यक सूचना देत प्रलंबित विकासकामे लवकर पूर्ण करण्याचा सूचना दिल्या.

आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यातून लाटे आळी येथील मुस्लिम कब्रस्थानात उभारण्यात आलेल्या वजूखान्याची त्यांनी पाहणी केली. यानंतर लाटे आळीतील शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक १ च्या नव्या इमारतीच्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. या कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

त्यानंतर बाबुराव नगर येथून न्हावरा फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याची त्यांनी पाहणी केली. या रस्त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रामलिंगचे उपसरपंच संजय शिंदे, माजी उपसरपंच बाबाजी वर्पे आणि अमोल वर्पे यांनी केली.

oplus_131074

या मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून परिसरातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांची वर्दळ असते. तसेच परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असल्याने हा रस्ता तातडीने विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी आढळराव यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, शिरूर मुस्लिम कब्रस्थानातील वजूखान्याच्या पाहणीनंतर फिरोजभाई बागवान आणि हुसेन शहा यांनी शिवाजीराव आढळराव यांचा सत्कार केला. तसेच कब्रस्थानातील अंतर्गत रस्ते व इतर मूलभूत सुविधा विकसित करण्याबाबतचे निवेदनही त्यांना सादर केले.

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात यांनी शिरूर येथील कुंभार आळीतील दशक्रिया घाटावर सभागृह उभारण्याची मागणी केली. दशक्रिया विधीनंतर होणारे भोजन व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होणार असल्याने या कामालाही प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

या विकासकामांच्या पाहणीवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार, शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, उमेश शेळके, नगरसेविका पूजा पोटावळे,

तर्डोबावाडीचे सरपंच जगन्नाथ पाचर्णे,अनिल पोटावळे, गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. राजेराम घावटे, विठ्ठल पवार, तुषार जांभळे, सुरेश गाडेकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button