Uncategorizedधार्मिंकविशेष
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिरूर शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळे, भक्तिसंगीत कार्यक्रम आणि विठ्ठल नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
लहान विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी परंपरेचा आनंद अनुभवला.
संध्याकाळी श्री. गणेश मराठे यांनी गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘सुंदर ते ध्यान’, ‘खेळ मांडियेला’, ‘दर्शन दे रे’, ‘विठ्ठल तो आला आला’, ‘अजी सोनियाचा दिनू’, ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘चंद्रभागेच्या तीरी’, ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ यांसह अनेक लोकप्रिय अभंग व भक्तिगीते सादर करण्यात आली. केतन गोसावी यांच्या ‘दिव्य सोहळा’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


उपस्थितांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास, सामाजिक समावेशकता आणि भारतीय संस्कृतीची जपणूक होत असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष दादा चौधरी व सचिव मनिषा चौधरी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाचे पूजन करण्यात आले. अभंग, भजन, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी रिंगण तर महिला पालकांनी फुगडी सादर करून वारकरी परंपरेचा आनंद लुटला.





