महाराष्ट्र
शिरूर शहर मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणांना विशेष सर्वसाधारण सभेची मंजुरी
म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेटची जागा नगरपरिषदेकडे कायम ठेवण्यासह वापर बदलाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शिरूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील विविध आरक्षणांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
विशेषतः म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेटसाठी देण्यात आलेल्या शासकीय जमिनीची मालकी नगरपरिषदेकडे कायम ठेवण्यास तसेच मंजूर विकास आराखड्यानुसार त्या जागेचा वापर बदलण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बदलासाठी महाराष्ट्र शासनाकडे आवश्यक प्रस्ताव पाठविण्यात आला असून संबंधित विभागांकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याची माहिती सभेत देण्यात आली.


