Uncategorizedविशेष

शिक्षक विजयकुमार शेजवळ यांचा सेवानिवृत्ती समारंभ ३१ मे रोजी

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}बाबुरावजी सणस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंगळवार पेठ, पुणे येथे गेली २३ वर्षे अध्यापन सेवा बजावणारे शिक्षक विजयकुमार मनोहर शेजवळ हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम रविवार, ३१ मे रोजी सायंकाळी ४ वाजता शिरूर येथील तिळवण तेली समाजाच्या मुंबई बाजार परिसरातील हनुमान मंदिर येथे होणार आहे.

समारंभास माजी प्राचार्य डॉ. सोहोनी, भाजपाचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे, प्रा. प्रवीण राठोड, प्रा. नामदेवराव सरोदे, भुजबळ सर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिक्षक विजयकुमार शेजवळ यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सामाजिक भान रुजविण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या समारंभास मित्रपरिवार, माजी विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button