Uncategorizedक्राईम

शिरूरमध्ये बोकड चोरीचा प्रकार उघड; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शहरातील मंगलमुर्ती नगर परिसरातून बोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला असून शिरूर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत जावेद अब्दुलगणी शेख (वय ४२, रा. मंगलमुर्ती नगर, शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २६ मे रोजी रात्री अडीच ते सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा चॉकलेटी-पांढऱ्या रंगाचा बोकड चोरीस गेला.

तसेच रमीज नजीर शेख, जमीर सय्यद, मन्सूर मेहबूब अन्सारी आणि तौसीफ युसुफ खान यांचेही बोकड चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी चौकी ईश्वर भोसले (वय २०), आर्यन एअरफोर्स पवार (वय २१), सोहम रामू भोसले (वय १६) आणि देवदास जीवदास काळे (सर्व रा. पाण्याची टाकी, शिरूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार शिंदे यांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार साबळे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button