क्राईम
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात शिरूर पोलिसांनी गुरुवारी (दि. २९) मोठी मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या.
तीन ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या, तर दोन ठिकाणी गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून हजारो लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे.





