राष्ट्रीय

छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे : नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे

तिथी नुसार शिवजयंती निमित्त शिवसेना { शिंदे }च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

oplus_131074

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}:छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोककल्याणकारी राज्यकारभार करत रयतेच्या हिताला प्राधान्य दिले. त्यामुळेच ते रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात, असे प्रतिपादन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी केले. तिथीनुसार साजऱ्या करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शहरप्रमुख मयूर थोरात, शिवजयंती उत्सव प्रमुख सुरेश गाडेकर, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेवक उमेश शेळके, पुष्कराज पोटावळे, शिवाजीराव वाळके, दादाभाऊ भुजबळ तसेच भाजप महिला आघाडीच्या प्रिया बिरादार आदी उपस्थित होते.

यावेळी मयूर थोरात म्हणाले की, शिवसेनेच्या वतीने दरवर्षी शहरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात उमेश शेळके, संजय बारवकर, सुभाष पवार आणि संदेश केंजळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळूमहाराज जोशी यांनी केले.शिवजयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने मूक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आमी त्याच बरोबर शिरूर नगरपरिषद शाळा मध्ये शिवरायांच्या जीवनावरती निबंध स्पर्धा  आयोजित करण्यात आली.त्याच बरोबर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप  करण्यात आले व पांजरपोळ या ठिकाणी जनावरांना चारा वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button