Uncategorized
Check Also
Close
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}’पुण्य परोपकार पाप ते परपीडा, अनेक नाही जोडा दुजा यासी ‘तुकाराम महाराजांच्या या ओवी मध्ये परोपकार म्हणजेच पुण्य असे म्हटले आहे. याच भावनेतून सामाजिक कार्यकर्ते संतोष थेऊरकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांना मोफत देवदर्शन घडवले.
या देवदर्शन वारीमध्ये थेऊरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या नागरिकांप्रती दाखवलेला सेवाभाव सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
मागील पंधरवड्यात त्यांनी दीडशेहून अधिक नागरिकांना वातानुकूलित बसेस मधून पंढरपूर तुळजापूर व अक्कलकोट देवदर्शन घडवले.प्रवास करताना नागरिकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न यावेळी थेऊरकर यांनी केला. शहरातून निघाल्यापासून ते देवदर्शन झाल्यानंतर शिरूरला पोहोचेपर्यंत अगदी कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे थेऊरकर यांनी सर्वच नागरिकांची मनोभावे सेवा केल्याने सर्वच नागरिक भारावून गेले.
या मोफत देवदर्शन सेवेविषयी या नागरिकांनी विशेषतः महिला वर्गाने प्रचंड समाधान व्यक्त केले. नागरिकांचे हे समाधान पाहून थेऊरकर यांनी लागलीच दुसऱ्या यात्रेचे नियोजन केले.यात अडीचशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष,सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर,माजी नगरसेवक पै.अशोक पवार,ह भ प रासकर, महाराज,ह भ प जनाबाई गायकवाड महाराज,कॅप्टन प्रभाकर थेऊरकर, निवेदक रावसाहेब चक्रे,दादा भुजबळ ,नवनाथ फरगडे ,शेखर दळवी,प्रवीण आढाव सर,स्टेट बँक कॉलनी येथील जेष्ठ नागरिक दिगंबर गायकवाड व महेश दांडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
डॉ अमित गायकवाड,संजय बाचकर,राहुल लोंढे,योगेश पवार,अक्षय भवर ,शिवम गोरे ,प्रथमेश सुतार, प्रसन्ना मैड ,आशिष थेऊरकर तसेच शिवरत्न प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते या थेऊरकर यांच्या मित्र परिवाराने देखील यात्रेत सहभाग नोंदवला व सहकार्य केले.