Uncategorized

फिनटेक ,इलेक्ट्रॉनिक व सेमीकंडक्टर ,ई कॉमर्स ,हेल्थकेअर्स व फार्मासिटिकल्स ऊर्जा, ॲग्रो व ॲग्रो प्रोसेसिंग तसेच फूड प्रोसेसिंग या क्षेत्रात भारताची मोठी प्रगती : अर्थअभ्यासक डॉ नरेश बोडखे

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम )
फिनटेक ,इलेक्ट्रॉनिक व सेमीकंडक्टर ,ई कॉमर्स ,हेल्थकेअर्स व फार्मासिटिकल्स ऊर्जा, ऍग्रो व ऍग्रो प्रोसेसिंग तसेच फूड प्रोसेसिंग या क्षेत्रात भारत मोठी प्रगती करत असून,,भारतीय अर्थव्यवस्था आता अमेरिका, चीन आणि जर्मनी नंतर जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था झाली असल्याचे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स चे प्रा डॉ नरेश बोडखे मo
येथील सनशाइन क्लबच्या वतीने प्रा.डॉ. नरेश बोडखे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स यांचे “भारतीय अर्थव्यवस्था : काल, आज आणि उद्या “या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा क्लबचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर ,डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड.अशोक पलांडे, जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, डॉ.संतोष पठारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ बोडखे यांनी यावेळी फिनटेक ,इलेक्ट्रॉनिक व सेमीकंडक्टर ,ई कॉमर्स ,हेल्थकेअर्स व फार्मासिटिकल्स ऊर्जा, ऍग्रो व ऍग्रो प्रोसेसिंग तसेच फूड प्रोसेसिंग या क्षेत्रात भारत मोठी प्रगती करत असून,,भारतीय अर्थव्यवस्था आता अमेरिका, चीन आणि जर्मनी नंतर जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था झाली असल्याचे मत व्यक्त केले.

जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था चांगले काम करीत असून भारतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढत आहे आणि त्यामुळे उत्पन्न व रोजगार वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

अतुल बोथरा यांना डेली न्यूज पोस्ट टीम -२४ चा वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविणे आवश्यक आहेत तसेच पुढचे वीस ते पंचवीस वर्षाचा विचार करून पायाभूत सुविधांची उभारणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता असमानता व गरिबी हे अर्थव्यवस्थेपुढील आव्हान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सद्य परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेतील डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढत असून डिजिटल पेमेंट मुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आरोग्य व शिक्षण या दोन्ही बाबी सरकारने कमी खर्चात जनतेस देणे आवश्यक आहे तसेच मातृभाषेत शिक्षण घेणे महत्त्वाचे असून दर्जेदार शिक्षण देणे हा अजेंडा सरकारचा असायला हवा .चांगला समाज घडविण्यासाठी चांगले शिक्षण महत्त्वाचे आहे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे निवड झालेली शिरूरची अनुष्का संतोष पठारे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मधून पदवी घेऊन यंदाच्या वर्षी सीए ची परीक्षा उत्तीर्ण झालेले केतन संजय बो-हाडे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ॲड. अशोक पलांडे व अनुष्का पठारे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . सतिश धुमाळ यांनी तर डॉ .वैशाली पठारे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button