शिरुर दिनांक ( वार्ताहर )मोबाईल आपल्या सखा न बनविता लोकांन मध्ये जा लोकांना सखा बनवा .मुले हे बेस्ट सॉयकॉलाजिस्ट असतात . पालकत्व सजगपणे निभावण्यासाठी पालकांनी दक्ष रहावेअसे सांगून निरलस वृत्तीने जीवन जगता आले पाहीजे असे पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आवाड यांनी शिरुर येथे म्हणाले.
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर विचार मंच शिरुर यांच्या वतीने पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आवाड यांचे
‘कोवळी तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा होते .माजी उपनगरध्यक्ष जाकिरखान पठाण , शोभना पाचंगे , विजेंद्र गद्रे , प्रा . डॉ . राजाभाऊ भैलुमे, मंचचे समन्वयक प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आवाड म्हणाले की नवीन पिढी तरुणाई गुन्हेगारी व व्यसनाचा विळाख्यात अडकली जात आहे . देशभरात साडेतीन लाख गुन्हात १८ वर्षाखालील १ लाखाहून आधिक मुले आहेत .गुन्हेगारीला कोणत्याही धर्म नाही. गुन्हेगारी ही मानसिकता आहे.
२०२३ मध्ये राज्यात अल्पवयीन मुलांच्या गुन्हाचा २३ हजार प्रकरणे पेंडिंग आहेत .तुमची मानसिकता बदल्या तंत्रज्ञानाचा वेगाशी जुळणारी पाहीजे .पुण्यात कोयत्या गॅगची १७ ते १८ वर्षाची मुले आपली दहशत पसरविण्यासाठी विविध कृत्य करतात .तलवारीने केक कापणे ,अशी कृत्ये करतात .दम देवून जागा खाली करणे कर्ज वसूली अश्या कृत्यातही अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो, हॅकिंग करणे यासारखी ही गुन्हे अल्पवयीन मुलांकडून होतात .
गुन्हे करण्या मागे गरिबी , बेरोजगारी व सुबत्ता अशी ही कारणे असू शकतात .
पालकांचे मुलांकडील दुर्लक्ष ,पेरेटिंगची झालेली एकाकी पध्दत , मुलांशी संवादाचा अभाव , विसंवादी संवाद , एकतर्फी संवाद अशी ही कारणे गुन्हे करण्या मागे असू शकतात असे आवाड म्हणाले .
पालकांनी त्यांच्या मुलांवर लादलेली स्वप्ने , मुलांच्या कडून अवास्तव्य अपेक्षा , संगत , यातून ही मुले गुन्हा कडे वळले जातात व त्यातून गुन्हेगारीत वाढ होत असते .ऐषारामी जीवन जगण्याचे आकर्षण , हाव यातून चोरीमारीचा गुन्हा कडे मुले वळतात यातून मोटार सायकल , गाड्या चोरीचे प्रमाण वाढते . मी इतरांपेक्ष्या मागे राहू नये इतरांकडे जे आहे ते आपल्याकडे असायला पाहीजे, यातून ही गुन्हेगारी कडे मुले जातात .सोशल मिडिया हा ही गुन्हेगारी वाढण्यासाठी महत्वाचा ठरत आहे . डिजिटल मिडियाचे ॲडिक होण्याने ही गुन्हेगारी कडे मुले जातात .
मेंटल्स डिप्रेशन कडे होणारा दुर्लक्षतेतून ही गुन्हेगारी वाढते .
गुन्हेगारी कडे वळणारा मुलांच्या राहणीमानात बदल होत जातात .
मुलांच्या वर्तनात व भावनेत होणा -या बदलाकडे पालकांचे लक्ष असले पाहीजे .ड्रग्ज व अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे ही गुन्हेगारी वाढते .
लहान मुलांच्या गुन्हा कडे पाहत असताना दृष्टीकोन बदलला पाहीजे .
गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी समाजातील सर्वाची आहे . मुलांच्या वर्तनात बदल करण्याचा प्रयत्न करता आला पाहीजे. मुलांवर प्रेम असेल तर पालक त्याला मारणार नाही .मुलाची चूक झाली तर आई वडील पाठीशी असतील तर ते आधारासाठी इतरांकडे जाणार नाही .चूक व जाणून बुजुन केलेल्या प्रमाद यातील फरक पालकांचा लक्षात आला पाहीजे . मुलांचे संगोपन योग्य पध्दतीने करण्याबाबत पालकांची कार्यशाळेचे आयोजन करावे असे आवाड म्हणाले .
सजगपणे पालकत्व निभावता आले पाहीजे . इतरांची मुले गुन्हे करतात माझी मुले करत नाही हा गैरसमज पालकांनी दूर केला पाहीजे .
मुलांच्या प्रायव्हसीवर लक्ष ठेवून त्यात डोकावून मुलांच्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येणार नाही . मुलांशी विविध विषयांवर पालकांना बोलता आले पाहीजे .डिजिटल साक्षरता मुलांच्या व पालकांच्या मध्ये असली पाहीजे .
मुलांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य जपावे. धाकट धपशा दाखवून मुले सुधारता येत नाही . . मुले प्रश्न विचारतात ही चांगली बाब आहे . प्रश्न विचारतात याचा राग पालकांनी करु नये .सोशल मिडियाच्या ॲडिशन पासून दूर होण्यासाठी डिजिटल कॉन्सलरची मदत घ्यावी .
मोबाईल आपल्या सख्या न बनविता लोकांन मध्ये जा , लोकांना सखा बनवा असे ते म्हणाले .
यावेळी प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे यांनी केले . पाहुण्याचा परिचय माजी नगरसेवक अशोक पवार यांनी करुन दिला . स्वागत ॲड . प्रदीप बारवकर यांनी केले .सूत्रसंचालन योगेश जामदार यांनी केले .आभार प्रवीण गायकवाड यांनी मानले .