

शिरुर येथे सनशाईन सॅटर डे क्लबचा वतीने गायकवाड यांचे ‘ माणूस आणि प्रॉपर्टी ‘ या विषयावर व्याख्यान झाले .
यावेळी क्लबचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर , पोलीस अधीक्षक तथा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नंदकुमार ठाकूर , अतिरिक्त जिल्हाधिकारी स्नेहा किसवे ( देवकाते ) , पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले , तहसिलदार आकाश किसवे , डॉ . गणेश झरेकर ,डॉ .अमित बडवे ,डॉ . रामदास पोटे , डॉ . संदिप कोकरे , लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धनक , डॉ. दीपक गायकवाड आदी उपस्थित होते .
गायकवाड यांनी शेतीचा शोध , शेती व शेतजमिनीची मालकी याची सविस्तर माहिती दिली . भारत देश स्वतंत्र्य झाला त्यावेळी ३०० प्रकारची विविध वतने होती . आज देवस्थान इनाम एवढेच वतन राहिले आहे .प्रशासन चालविणा-या आधिका-यांना लोकांची भाषा कळली पाहीजे. लोकांची भाषा कळली नाही तर प्रशासनात काम करणे अवघड होईल. कायदा पेक्ष्या माणूस हा किचकट आहे. लोकांमध्ये कायदाचे अज्ञान आहे . भानगडीच्या जमिनी विकणारा नवीन वर्ग तयार होत आहे . देशात ४ .८ कोटी एवढ्या संख्येने जमिनी संदर्भातील प्रकरणे न्यायालयात असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी प्रास्ताविक माजी सनदी आधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले .स्वागत डॉ. संदिप कोकरे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी तर आभार माजी सनदी आधिकारी प्रभाकर गावडे यांनी मानले .
