घोडनदी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर व स्टाफ चे पदाकरिता आर्थिक निधी मंजुरीबाबत घोडनदी बार संघटनेचे अध्यक्ष व संघटनेच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा
शिरुर दिनांक ( वार्ताहर )
घोडनदी न्यायालय येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर चे आस्थापनास उच्च न्यायालय मुंबई यांनी मंजुरी देऊन सदरचा प्रस्ताव प्रिन्सिपल सेक्रेटरी विधी न्याय शाखा महाराष्ट्र शासन मंत्रालय येथे कोर्ट व स्टाफ चे पगाराचे तरतुदी करिता पाठविला असल्याची माहिती शिरुर वकिल संघटनेचे अध्यक्ष नोटरी अमित खेडकर यांनी दिली .
खेडकर म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निवासस्थानी भेट घेऊन घोडनदी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर व स्टाफ चे पदाकरिता आर्थिक निधी मंजुरीबाबत चर्चा केली करण्यात आली .उपमुख्यमंत्री पवार यांनी लवकरात लवकर वरील बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे खेडकर यांनी सांगितले .
उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन देताना घोडनदी बार असोसिएशन चे अध्यक्ष नोटरी अमित खेडकर यांच्या समवेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी चेअरमन व आळंदी देवस्थान चे अध्यक्ष ॲड .राजेंद्र उमाप उपाध्यक्ष ॲड . यमराज शिंदे, ॲड .अतिश लांडगे , नोटरी किरण आंबेकर ॲड . सतीश गवारी, ॲड . निनाद मगर , पुणे बार असोसिएशन चे सचिव ॲड .पृथ्वीराज थोरात हे उपस्थितीत होते.