राष्ट्रीय

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेत तब्बल तीन वेळेस शिरुरच्या सुकन्या आयपीएस डॉ. मानसी साकोरे यांनी उत्तीर्ण होत घडविला इतिहास

तीन वेळेस केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची अविस्मरणीय कामगिरी केल्याबद्दल सर्व स्तरातून डॉ . मानसी साकोरे यांचे कौतुक

शिरूर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
एकदा नाही दोनदा नाही तब्बल तीन वेळेस शिरुरच्या सुकन्या व आयपीएस आधिकारी डॉ .मानसी नानाभाऊ साकोरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेत यश मिळवित यशाचा उत्तुंग झेंडा फडकावित शिरुरचे व साकोरे परीवाराचे नाव दशदिशात पोहचवले आहे . त्यांना देशपातळीवर ४५४ वी रॅक मिळाली असून तीन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी शिरुर तालुक्यातील त्या पहिल्या सुकन्या ठरल्या आहेत .
शिरुर शहरातील छत्रपती कॉलनीत नानाभाऊ साकोरे यांचे कुटुंब वास्तव्यास असून त्यांना दोन मुली असून एक मुलगा डॉक्टर आहे .साकोरे यांची मोठी कन्या डॉ . दिपिका साकोरे या नागपूर येथे आरोग्य खात्यात डायरेक्टर आहेत तर त्याचे पती कृष्णात पाटील रेल्वेत ( आयआरएस ) वरिष्ठ आधिकारी आहेत . तर मुलगा डॉ. जय हा एम. एस आर्थो. आहे .
डॉ मानसी साकोरे या पूर्वी आयपीएस झाल्या होत्या .परंतु आयएएस होण्याचे स्वप्नपुर्ती साठी त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास कायम ठेवत परीक्षा दिली व त्यात त्याना यश प्राप्त झाले . डॉ . मानसी यांना पहिल्या वर्षी ५६३ वी रॅक मिळाली. मागील वर्षीच्या परीक्षेत त्यांना ५३१ वी रॅक मिळाली होती .तर यंदाचा वर्षी ४५४ वी रॅक मिळाली .
डॉ. मानसी यांनी पुन्हा तिस-यादा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत यंदा ४५४ वी रॅक मिळवली . डॉ . मानसी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गिय अर्जुंनदादा शेटे यांच्या नात आहेत.
डॉ .मानसी यांचे प्राथमिक शिक्षण शिरुर नगरपरिषद मराठी सेंटर शाळेत झाले .त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी विद्याधाम प्रशालेतून पूर्ण करीत बीडीएसला प्रवेश घेतला. लहानपणापासून कुशाग्र बुध्दिमत्तेचा डॉ .मानसी होत्या . शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांनी यश मिळविले होते .
मानसी यांचे वडिल नानाभाऊ हे सैन्यदलातून वरिष्ठ अभियांत्रिकी आधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत तर आई रंजना या गृहिणी आहेत .मानसी यांनी सुरवातीचा तीन महिने परीक्षेचा तयारीसाठी क्लास लावला त्यानंतर संपूर्ण परीक्षा व अभ्यासाची तयारी त्यांनी घरीच केली .
आपल्याला डॉक्टर होण्याची तीव्र इच्छा होती पण परिस्थिती अभावी मला डॉक्टर बनता आले नाही पण माझे डॉक्टरकीचे स्वप्न तीनही मुलांनी डॉक्टर होवून साकार केले . व तीन्ही मुलांचे भविष्य व करियर घडविण्यात पत्नी रंजना यांचे मोठे योगदान आहे . सैन्य दलातील नोकरी मुळे घरापासून मी दूर असताना मुलांना घडविण्याचे व त्यांना सुसंस्कारित करण्याचे काम पत्नी रंजना यांनी केल्याचे नानाभाऊ साकोरे यांनी नम्रपणे सांगितले. मानसीच्या यशात आई रंजना हीच्या सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले .
डॉ .मानसी म्हणाल्या की तुम्ही मोठे होण्याची स्वप्ने पाहा. ग्रामीण भागातील व मराठी माध्यमात शिक्षण घेतलेली मुले ही केंद्रीय लोकसेवा आयोगाचा परीक्षेत यश मिळवू शकतात. मोठे स्वप्न पाहण्याची इच्छा व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास जिद्द , चिकाटी व कष्ट घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला यश मिळते . स्पर्धा परीक्षेची तयारी करताना करियर संदर्भात ए , बी असे प्लॅन ही आवश्यक असल्याचे सांगितले . यशाला कोणत्याही शॉर्टकट नसतो मेहनत व अभ्यासात सातत्य याला पर्याय नाही असे मानसी म्हणाल्या. आपल्याला लहानपणापासून समाजाची सेवा करण्याची आवड होती. समाजाची सेवा करता येईल म्हणूनच प्रशासनात जाण्याचा निर्णय घेतला व स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याचे मानसी यांनी सांगितले.
डॉ. मानसी यांचा विवाह निश्चित झाला असून त्याचे पती अभिजीत पठारे हे ही आयएएस आहेत . रेल्वेचे वरिष्ठ आधिकारी ( आयआरएस ) व साकोरे परिवाराचे ज्येष्ठ जावई कृष्णात पाटील यांनी ही डॉ. मानसी यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले .डॉ मानसी यांच्या यशाबद्दल तीचे आई वडिल , मित्र मैत्रीणी व शहरातील विविध संस्था संघटना आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button