राष्ट्रीय
Check Also
Close
-
शिरूर पोलीस ठाण्याचे आता नव्या वास्तूतून कामकाज3 weeks ago
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: खान्देशवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्री कानबाई माता उत्सवाचा पहिला वर्षपूर्ती सोहळा शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला.
रामलिंग येथील प्रभू रामलिंग मंदिरासमोरील सभामंडपात आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय उत्सवाला शिरूर पंचक्रोशीतील खान्देशी बांधव-भगिनींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तेथे विधिवत पूजा-अर्चा करून देवीची स्थापना करण्यात आली.
पारंपरिक संगीत आणि ढोलकीच्या तालावर उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सुमारे पाच हजार भाविकांनी श्री कानबाई मातेचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
वाद्यांचा गजर आणि ‘कानबाई मातेचा जयघोष’ यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मिरवणुकीनंतर विधिवत विसर्जन सोहळ्याने उत्सवाची सांगता झाली.
पहिल्याच वर्षी उत्सवाला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता आगामी काळात हा उत्सव अधिक व्यापक स्वरूपात साजरा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

