Uncategorized

विद्यार्थ्यांनी भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम होणे काळाची गरज — जाकीरखान पठाण

 

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शिरूर येथे विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानविषयक आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि कोडिंग प्रशिक्षण उपक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

रयत शिक्षण संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून विविध शाखांमध्ये एआय अभ्यासक्रम सुरू केला आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेचे  चंद्रकांत दळवी आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

एआय शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेने सिमूसॉफ्ट आणि एनपॉवर यांच्यासोबत करार केला आहे. बँक ऑफ अमेरिका यांच्या आर्थिक सहकार्याने, युवा अनस्टॉपेबल या स्वयंसेवी संस्थेच्या भागीदारीत आणि ENpower या संस्थेच्या अंमलबजावणी भागीदारीत हा उपक्रम सुरू आहे. पुणे, मुंबई आणि गुजरातमधील एकूण १५१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एआय आणि कोडिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे.

कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण प्रमुख उपस्थित होते. तसेच ENpowerचे प्रकल्प अधिकारी प्रशांत गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. अतुलकुमार बेंद्रे, संजयजी बाफना, अॅड. अमित खेडकर, डॉ. मीनल जाधव, धर्मा मॅड, दीपक शेजवळ, प्रकाश ठोकळे, संजय वेदपाठक, सौ. पूजा घावटे, सौ. उर्मिला जठार, सौ. सोनम वाघमारे, सौ. योगिता ओव्हाळ, सौ. उषा नरवडे आणि सौ. दीपाली गायकवाड उपस्थित होते. पर्यवेक्षक सरोदे ए. के. यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय मचाले यांनी केले. प्रशांत गायकवाड, संजय वेदपाठक, समीर तांबोळी आणि विभागप्रमुख पारधी एल. पी. यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मनोगतात जाकीरखान पठाण यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक, सर्जनशील आणि जबाबदारीने वापर करून विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते एआय आणि कोडिंग प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गावित्रे व्ही. जी., एल. पी. आणि ENpowerचे मार्गदर्शक अमर सरोदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योगदानाबद्दल जाकीरखान पठाण यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ. ढाकणे आणि इयत्ता दहावी ‘अ’च्या विद्यार्थिनींनी एआय विषयावर आधारित आकर्षक रांगोळी साकारली. आधुनिक तंत्रज्ञानाची संकल्पना कलात्मक पद्धतीने मांडणाऱ्या या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शेख एस. एस. यांनी केले, तर आभार सौ. रासकर एस. ए. यांनी मानले. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य, तार्किक विचारक्षमता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने एआय आणि कोडिंग प्रशिक्षणाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button