Uncategorized

शिरूरमध्ये ‘रिवाझ गोल्ड’ या भव्य सुवर्णदालनाचे दिमाखात उद्घाटन!

अभिनेत्री सायली संजीव यांची उपस्थिती; पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांच्या आकर्षक संग्रहाला ग्राहकांची पसंती मिळण्याचा विश्वास

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}सुवर्णालंकार क्षेत्रात नवी ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने शिरूर शहरातील बाबुरावनगर येथे ‘रिवाझ गोल्ड’ या भव्य व अत्याधुनिक सुवर्णदालनाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील हायवे सेंटर मॉलमध्ये (ज्युदिओ मॉलशेजारी) सुरू झालेल्या या दालनामुळे शिरूरकरांना पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आकर्षक खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या उद्घाटन सोहळ्यास अभिनेत्री सायली संजीव, अप्पर जिल्हाधिकारी स्नेहा किसवे, तहसीलदार आकाश किसवे, पंचायत समितीच्या सभापती स्वाती घावटे, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, पोलीस उपअधीक्षक रवींद्र भोसले, पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले, पोलीस अधिकारी प्रदीप बाबर, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, मालतीताई बाबुराव पाचर्णे, माजी नगराध्यक्षा उज्ज्वला बरमेचा, अभय बरमेचा, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, माजी सरपंच विठ्ठल घावटे, प्रभू घावटे, प्रसाद घावटे, सतीशशेठ धाडीवाल, डॉ. संगीता हथे, डॉ. प्रदीप पालवे सविता घावटे, अमृतेश्वरी घावटे, दीपक घावटे, सुनील घावटे, यशवंत सेनेचे रामकृष्ण बिडगर, नगरसेविका संगीता मल्लाव, स्वीटी शिंदे, सुनीता भुजबळ, रिंकू जगताप, राजेंद्र लोळगे, डॉ . सुनिता पोटे, आबासाहेब सरोदे,मुझफ्फर कुरेशी, संदीप गायकवाड, अमित कर्डिले, डॉ. हिरामण चौरे, प्रा. रतनकुमार ससाणे, प्रा. व्ही. डी. शिंदे, प्रा. सुधीर शिंदे, प्रदीप बारवकर, सुदाम कोलते, विनोद धाडीवाल, देवल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अभिनेत्री सायली संजीव यांनी ‘रिवाझ गोल्ड’मधील दागिन्यांच्या आकर्षक संग्रहाचे कौतुक केले. सर्वसामान्य ग्राहकांनाही परवडतील असे कमी वजनाचे, आकर्षक डिझाइनचे दागिने येथे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. डायमंड ज्वेलरीसाठी स्वतंत्र विभाग हे या दालनाचे विशेष आकर्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले. सोने ही केवळ अलंकाराची वस्तू नसून गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे म्हणाले की, मराठी माणूस सोन्या-चांदीच्या व्यवसायात पुढाकार घेत असून ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी शिरूरमध्ये मोठ्या शहरांच्या धर्तीवर पारंपरिक दागिन्यांसोबतच विविध नावीन्यपूर्ण डिझाइनचे दागिने उपलब्ध करून देणारे दालन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण यांनी या दालनामुळे बाबुरावनगरच्या वैभवात भर पडणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजाराम घावटे यांनी शुद्धता, गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास या बाबींना प्राधान्य देत सोन्या-चांदीचे दागिने उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. डॉ. संदीप कोकरे आणि अमित शाह यांच्या साथीने ‘रिवाझ गोल्ड’ या दालनाची सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रिवाझ गोल्ड परिवाराच्या वतीने गंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजाराम घावटे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. संदीप कोकरे, व्ही. के. ज्वेलर्सचे अमित शाह, डॉ. सुजाता कोकरे आणि अमृता घावटे प्रसाद घावटे यांनी सोहळ्याचे यजमानपद भूषविले. डॉ. संदीप कोकरे, अमित शाह, डॉ. सुजाता कोकरे आणि अमृता घावटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले, तर आभार डॉ. सुजाता कोकरे यांनी मानले.

व्यावसायिक विस्तारासोबतच शिरूरकरांना विश्वासार्हता, शुद्धता आणि दर्जेदार दागिन्यांचा अनुभव देणारे दालन उपलब्ध करून देणे, हा ‘रिवाझ गोल्ड’ सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रा. डॉ. राजाराम घावटे, डॉ. संदीप कोकरे आणि अमित शाह यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button