क्राईम
पोलीसांना अपहरणाचा खोटा कॉल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)डायल ११२ आपत्कालीन क्रमांकावर अपहरण केल्याचा खोटा कॉल देवुन सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणा-या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

प्रसाद भानुदास देशमुख सध्या रा. नारायणगाव ता .जुन्नर. जि .पुणे मुळ रा. जाखुरी ,ता. संगमनेर जि. अहिल्यानगर याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी होनेवाडी ,टाकळी हाजी , ता. शिरूर ,जिल्हा पुणे येथील प्रसाद भानुदास देशमुख सध्या रा. नारायणगाव , ता. जुन्नर ,जि .पुणे मूळ रा, जाखुरी ता संगमनेर जि अहिल्यानगर याने त्याचा मोबाईल वरून त्यांचे कंपनीचे काम करणारे वरिष्ठ अधिकारी गौरव हारदे रा. राहुरी ता. राहुरी , जिल्हा – अहिल्यानगर यांना कॉल करून मला शेतकरी नवनाथ शंकर होणे यांनी तसेच इतर आठ व्यक्ती यांनी किडनॅप करून बांधून ठेवले आहे व पाच लाख रुपयांची मागणी करत आहे अशी जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन त्याबाबत प्रसाद देशमुख काम करत असलेल्या कंपनी मधील पंकज शिंदे रा. नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी डायल ११२ वर कॉल करून प्रसाद देशमुख याचे सांगणे वरून खोटी माहिती देऊन सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे संतोष सुभाष बनसोडे, पोलीस अंमलदार, शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे .

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आवाहन केले आहे की, नागरीकांनी डायल ११२ कमांकाचा वापर हा आपत्कालीन स्थितीमध्ये करून खरी परीस्थितीबाबत माहिती दयावी. डायल ११२ या क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती पुरविणा-यावर सरकारी यंत्रणेचा वेळ व संसाधनांचा गैरवापर केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. खोट्या माहितीवर आधारित अशा प्रकारांबाबत सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
