Uncategorized

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सामाजिक बांधिलकीचा संदेश देत पूजा पोखरणा यांचा वाढदिवस साजरा

  1. शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी अधोरेखित करण्याची संधी आहे, याचा प्रत्यय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्त पूजा विकास पोखरणा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातून आला. वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

या प्रसंगी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पूजा पोखरणा यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाला नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे प्रमुख विकास पोखरणा, विश्वस्त आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या कामिनी बाफना, प्राचार्या पसक्कीन काशी, भाग्यश्री शिंगवी, वृषाली मुसळे तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी सांगितले की, पूजा पोखरणा यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर उच्च शिक्षण पूर्ण करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही त्या सातत्याने सक्रिय राहून समाजहितासाठी कार्य करतात. व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी आणि जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण उत्साहपूर्ण आणि भावनिक बनले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच समाजोपयोगी मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या पसक्कीन काशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदित्य पोखरणा यांनी केले.

यावेळी बोलताना पूजा पोखरणा यांनी वाढदिवसानिमित्त मिळालेल्या प्रेम, शुभेच्छा आणि सदिच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “समाजातील विविध घटकांकडून मिळणारे हे प्रेम आणि पाठबळ माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या शुभेच्छांमुळे समाजासाठी अधिक जोमाने आणि जबाबदारीने कार्य करण्याची ऊर्जा मिळते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा झालेला हा वाढदिवस केवळ एका व्यक्तीच्या आनंदाचा सोहळा न ठरता समाजसेवा, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम ठरला. त्यामुळे उपस्थितांच्या मनात प्रेरणेची नवी पालवी फुलल्याची भावना व्यक्त होत होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button