शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}
पिंपरखेड, ता. शिरूर येथे बिबट्याने दिवसाढवळ्या केलेल्या हल्ल्यात १३ वर्षाच्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोहन विलास बोंबे
वय- 13 वर्षे पिंपरखेड (आंबेवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

अवघ्या १५ दिवसाच्या काळात दोन लहान मुलांसह ज्येष्ठ महिलेच्या बिबट्याच्या हल्ल्यात जांबुत व पिंपरखेड भागात मृत्यू झाल्याने नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी वनखात्याच्या गस्त घालणारा वाहनाची मोडतोड व जाळपोळ केली असुन परिसरात तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान वनखात्याने पिंपरखेड व जांबूत परिसरात ३५ पिंजरे बिबटया जेरबंद करण्यासाठी लावले असून आता पर्यंत त्यात ९ बिबटे जेरबंद झाल्याची माहिती तालुका वनाधिकरी निळकंठ गव्हाणे यांनी दिली .
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी पावणेचारच्या सुमारास पिंपरखेड येथील आंबेवाडी येथे घडली.रोहन विलास बोंबे वर बिबट्याने हल्ला केला आणि ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात रोहन मृत्यूमुखी पडला.

१२ ऑक्टोबर रोजी पिंपरखेड, ता. शिरूर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात साडेपाच वर्षाच्या बालिकेस प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली. शिवन्या शैलेश बोंबे वय साडेपाच वर्ष रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे असे या मुलीस प्राण गमवावी लागल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा या परिसरात रोहन बोबे या १३ वर्षाच्या मुलास बिबटयाच्या हल्ल्यात प्राण गमावावे लागल्याने परिसरात संतापची लाट निर्माण झाली असून भीती व काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमच्या मुला बाळावर दिवसा ढवळ्या बिबटे हल्ले करतात आम्ही कस जगायचं. बिबट्याचा दहशतीने येथील जनजीवनावर परिणाम झाला आहे.
ऐन दिवाळीत जांबुत येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव वय -८५ रा.जांबूत या ज्येष्ठ महिलेच्या मृत्यू झाला .आता पर्यत शिरूर तालुक्यातील १२ हुन अधिक जण बिबटयाच्या हल्ल्यात मरण पावले आहेत .

दरम्यान जांबुत येथे, टाकळी हाजी असून पिंपरखेड परिससरात मागील काही दिवसात बिबटयाना जेरबंद करण्यासाठी ३५ पिंजरे लावण्यात आले व त्यात ९ बिबटे जेरबंद करण्यात आले असल्याचे तालुका वनधिकारी निलकंठ गव्हाणे यांनी सांगितले.
म्हाडाचे सभापती व माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिरूर आंबेगाव खेड जुन्नर या भागातील वाढत्या बिबटयाची संख्या लक्षात घेता केंद्र शासनाने बिबटया निवारा केंद्र उभे करून बिबट्याची रवानगी निवारा केंद्रात करावी अशी मागणी केली.

१२ ऑक्टोबर रोजी पिंपरखेड, ता. शिरूर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात साडेपाच वर्षाच्या बालिकेस प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली. शिवन्या शैलेश बोंबे वय साडेपाच वर्ष रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे असे या मुलीस प्राण गमवावी लागल्याची घटना ताजी असताना. बिबट्याचा हल्ल्यात ज्येष्ठ महिलेस प्राण गमवावे लागल्याने परीसरात भीतीचे वातावरण आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्याची घटना आज बुधवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी पहाटे सहाच्या दरम्यान घडली.
सकाळी सहा वाजेच्या सुमारास जांबुत थोरातवस्ती येथे लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या भागुबाई रंगनाथ जाधव या ८५ वर्षीय महिलेवर घराबाहेर दबा धरून बसलेल्या बिबटयाने हल्ला करून महिलेला उसाच्या शेतात ओढून घेऊन गेला.त्या बाहेरून घरात न आल्याने त्यांच्या मुलाने पाहिले असता त्यांना रक्त दिसल्याने त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोधाशोध केली ही घटना कळताच नागरिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह घरापासून पाचशे मीटर लांब उसाच्या शेतात सापडला. वृद्ध महिलेच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

. बिबटयाच्या वाढत्या व सातत्यपूर्ण वावराने पिंपरखेड ,जांबुत परिसरात भीतीचे वातावरण आहे .या परिसरातील बिबटयाच्या कायम स्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

चौकट
भय इथले संपत नाही.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबुत, टाकळी हाजी तसेच पुर्व भागातील मांडवगण फराटा , इनामगाव या परिसरातील अनेकांना बिबट्याच्या ह्ल्ल्यात प्राण गमावावे लागले आहेत .
पिंपरखेड जांबुत भागातील समृध्द सचिन जोरी , पूजा भगवान नरवडे , पूजा जालिंधर जाधव , मुक्ताबाई भाउ खाडे , इनामगाव येथील लक्ष्मीबाई बबन भोईटे वय-९० , टेंभेकर वस्ती येथील शिवतेज टेंभेकर वय – ४,
वश सिंग व रक्षा निकम, शिवन्या बोंबे भागुबाई जाधव, रोहित बोबे अन्य असे १२ हुन अधिक जणांना बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमावावे लागले आहेत.
कुत्रे , शेळ्या, मेंढ्या, यांच्यावर ही सातत्याने हल्ले होत आहे. हल्ले झाले की प्रशासन जागे होते. बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावणे, गस्त या सारखे उपाय काही दिवस केले जातात. हल्ल्याचा चर्चेची तीव्रता कमी झाले की मागचे पाढे पुढे अशी गत होते. बिबट्या चा हल्ल्याने भयभीत झाल्यामुळे याभागातील शेतीसह दैनदिन कामावर ही परिणाम होत आहे. 

साधारणपणे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड याभागात काही वर्षापासून बिबट्यांचा वावर होता आणी आहे. पण मागील काही वर्षापासून शिरूर तालुक्यातील बिबट्याचा वावर आणि उपद्रव वाढला आहे. आता शिरूर तालुक्याची ओळख बिबट्याचा वावर असणारा तालुका अशी होवू लागली आहे. पूर्वी शिरूर तालुक्यातील जांबूत,पिंपरखेड, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या बेट भागात असणारा बिबट्याचा वावर मांडवगण फराटा, वडगाव रासाई,पिंपळसुटी,इनामगाव, न्हावरा या पूर्व भागात ही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
शिरूर तालुक्या हा तसा दुष्काळी तालुक्या होता परंतु तालुक्यात डिंभा,व चासकमान कालवाचे आलेले पाणी व विविध नद्या यामुळे बागायती क्षेत्र वाढले. त्यात ही उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. साहजिकच मागील काही वर्षापासून उसाचे क्षेत्र ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे .उस क्षेत्र हे बिबट्याचा वास्तव्यासाठी अनुकूल ठरत आहे. उसाचा पिका मध्ये बिबटे आपल्या निवारा करत आहे. त्याच प्रमाणे पाण्याची सहज उपलबध्ता, बिबट्याला लपण्यासाठीचे मोठ्या प्रमाणावर लपनक्षेत्र आणि बिबट्यांचे भक्ष्य असणारे शेळ्या ,मेंढ्या व कुत्र्यांची उपलब्धता यामुळे त्याला शिकार ही उपलब्ध होते. त्याखेरीज या परिसरातील बिबट्याची पिढी या उसाचा क्षेत्रातच वाढली असल्याने परिसराशी त्यानी समायोजन केले आहे. साहजिकच या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून भक्ष्य न मिळाल्यास हा बिबट्या मानवी वस्तीकडे धाव घेवून हल्ले ही करू लागला आहे. यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे .
