शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आषाढी एकादशीनिमित्त शिरूर शहरात विविध धार्मिक व सामाजिक संस्थांच्या वतीने भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भक्ती, संस्कृती आणि समाजसेवेचा संगम अनुभवायला मिळणार आहे. ओंकार संगीत विद्यालयाच्या वतीने भक्तिसंगीताची मैफल, तर ओन्ली वुमन्स जिम आणि वुमन्स सोशल फाउंडेशनच्या वतीने खिचडी वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
असून, विठ्ठलभक्तांना भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला संगीताचा अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांच्या विचारांचा संदेश आणि भक्तीभाव संगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे प्रसिद्ध गायक वैभव उर्फ गणेश मराठे यांनी सांगितले.









