विशेष

संपदा पतसंस्था शिरूर संस्थेस १ कोटी ७ लाख रु. निव्वळ नफा

पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव वराळ यांची माहिती

चेअरमन शिवाजीराव वराळ
संपतराव वाळूंज

शिरूर -( डेली न्यूज पोस्ट टीम -24 )राज्य कार्यक्षत्र व पतसंस्था चळवळीत अग्रेसर असलेल्या संपदा नागरी सह.‌ पतसंस्थेला न्चन्लु आर्थिक वर्षात रु.१ कोटी ७ लाख रुपयेचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शिवाजीराव वराळ यांनी दिली.
चालू आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपल्यानंतर संस्थेची आकडेवारी जाहिर करण्यात आली . संस्थेकडे मार्च २०२५ अखेर १०० कोटी ८ लाख रु च्या ठेवी आहेत. संस्थेचे वसूल भाग भांडवल ४ कोटी २१ लाख आहे. संस्थेचे खेळते भाग भांडवल १३७ कोटी ५८ लाख रुपयाचे आहे. संस्थेने विविध प्रकारचे रु. ७१ कोटी ७३ लाख रु. चे कर्ज वाटप केले आहे. तसेच बॅक शिल्लक व सुरक्षित गुंतवणूक ५५ कोटी ९८ लाख रु .आहे. अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन अमित गव्हाणे यांनी सांगितले .
संस्थेची स्थापना दि. ९ नोव्हेंबर २००१ रोजी झाली असून २४ वर्षाच्या कालावधीत संस्थने सभासदरांच्या विश्वासावर प्रगती केली आहे. संस्था सभासदर्शना घरखरेदी, व्यवसाय वाढ, स्थावर मालमत्ता खरेदी, वाहन खरेदी, सोने तारण कर्ज तसेच गोरगरीब गरजू, सुशिक्षित बेरोजगार लघुउद्योजक, बचत गट यांचे माध्यमातून कर्ज वाटप केले जाते. अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक संपतराव वाळूंज यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button