महाराष्ट्रराजकीयविशेष

शिरूर मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी करिता मोठया उत्साह. मोठ्या संख्येने मतदान

एकूण ७५% हून अधिक मतदान

oplus_131074

oplus_131074
oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांचा थेट सहभाग असल्याने प्रतिष्ठेची ठरलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिरूर तालुक्यात विक्रमी उत्साहात मतदान झाले. तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या मतदानात एकूण ७५% हून अधिक मतदान झाले.दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५५.१९ टक्के मतदान नोंदवले गेले होते.दुपारी साडेतीनपर्यंत ८५,९०५ पुरुष, ८०,६४६ महिला व इतर दोन मतदार इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी चारनंतर अनेक मतदान केंद्रांवर स्त्री-पुरुषांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

सकाळी मतदानाचा वेग तुलनेने मंद असला, तरी दुपारनंतर आणि विशेषतः सायंकाळी मतदारांचा ओघ वाढला. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी टाकळी हाजी येथे, माजी आमदार काकासाहेब पलांडे यांनी मुखई येथे, तर माजी आमदार अशोक पवार यांनी वडगाव रासाई येथे मतदान केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी न्हावरा येथे मतदानाचा हक्क बजावला.

शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटातून दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे निवडणूक रिंगणात आहेत. मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी व माजी सभापती सुजाता पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादा पाटील फराटे हे स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे सरपंच सचीन शेलार आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मच्छिंद्र गदादे मैदानात आहेत.

टाकळी हाजी गटातून माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे भाजपाकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दामूअण्णा घोडे यांच्यात थेट लढत होत आहे. रांजणगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या स्वाती पाचुंदकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पाचुंदकर यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तरडोबाची वाडी, शिरूर, रामलिंग, गोलेगाव, अण्णापूर, न्हावरा, करडे व निमोणे येथे मतदान उत्साहात झाले.

मांडवगण फराटा, वडगाव रासाई, टाकळी हाजी, कवठे येमाई, रांजणगाव, कारेगाव, तळेगाव, शिक्रापूर, कोरेगाव, सणसवाडी, कान्हूर मेसाई, मलठण, जातेगाव व पाबळ परिसरातही मतदानासाठी मोठी गर्दी दिसून आली.

आकडेवारीनुसार सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत ७.२१ टक्के (२१,७६१) मतदारांनी मतदान केले. साडेनऊ ते साडेअकरा या कालावधीत २१.३७ टक्के (६४,४९५) मतदान झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत ३८.४८ टक्के म्हणजेच १,१६,११६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान टाकळी हाजी गटात नोंदवले गेले.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ३७१ मतदान केंद्राध्यक्ष, १,११३ मतदान अधिकारी, ३७१ शिपाई व ३७१ पोलीस शिपाई यांच्यासह आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास सक्त बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, मतमोजणी सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार असून, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या रांजणगाव एमआयडीसी, कारेगाव येथील गोदाम क्रमांक ३ मध्ये २८ टेबलांवर विभागनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक निवडणूक विभागासाठी दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करून पुढील विभागाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एकूणच, कुटुंबीयांची प्रतिष्ठा, पक्षीय समीकरणे आणि विकासाचे मुद्दे यामुळे शिरूर तालुक्यातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button