Uncategorized
निसर्ग आणि विकास यांचा समतोल राखणे गरजेचे – ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड



शिरूर येथील बागवान नगर परिसरातील नोटरी रवींद्र खांडरे यांच्या कार्यालयास आव्हाड यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी खांडरे परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आव्हाड यांनी पर्यावरण संवर्धनाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले
पर्यावरण संरक्षण अधिनियम, जलप्रदूषण नियंत्रण कायदा, वायुप्रदूषण प्रतिबंधक कायदे यांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. नागरिकांनीही या कायद्यांची माहिती घेऊन आपले हक्क आणि कर्तव्ये ओळखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक कार्यकर्ते भरत कालेवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, रवि लेंडे, ‘आम्ही शिरूरकर फाउंडेशन’चे रविंद्र सानप, पुष्कराज पोटावळे, शिवसेनेचे नेते कैलास भोसले, आनंद नागरी पतसंस्थेचे संचालक देवल शहा, अविनाश घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

