






वासापूजनावेळी मंत्रोच्चार, शिवनामस्मरण आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विधींच्या साक्षीने कार्यक्रमस्थळावर पावित्र्यपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धरिवाल व आदित्य धारिवाल आणि पी. आर. धारीवाल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. ध्वजवंदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड यांच्या हस्ते झाले.
यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नसीम खान, शिवसेवा मंदिर विश्वस्त, रामलिंग मंदिर विश्वस्त, नगरसेवक, नगरसेविका, विविध गणेश मंडळाचे कार्यकर्त, संघपती भरत चोरडिया, वैजापूरचे विशाल संचेती,कापड व्यवसायिक सुनील धाडीवाल, मनसुखलाल गुगळे, ,आयोजक, विश्वस्त, ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मनोभावे पूजा करून भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होत शिवकथेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रार्थना केली.


