Related Articles
Check Also
Close

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24)शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.







