राष्ट्रीय

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शिरूरमध्ये विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}: लोकजागृती चळवळीच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शिरूरमध्ये विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांती दिनानिमित्त रविवारी सकाळी साडेनऊ वाजता क्रांती चौकातील हुतात्मा स्मारकावर शहीद हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती लोकजागृती चळवळीचे रवींद्र धनक यांनी दिली.

दरम्यान, क्रांती दिन तसेच आचार्यश्री आनंदऋषी महाराज यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त ३४व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिरूर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात रविवारी सकाळी १० वाजता हे रक्तदान शिबिर होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन धनक यांनी केले आहे.

याचबरोबर महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या शिरूर नगरपालिकेत सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार असून, तपासणीसाठी येणाऱ्या सर्व महिलांना तपासणी कार्ड देण्यात येणार आहे.

महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी डॉ. वैशाली साखरे (९८८१२ ५६८९७), सौ. सविता बोरुडे (८६६९३१४७७७) व सौ. प्रीती बनसोडे (७४९९९ ३४३४९) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button