महाराष्ट्र
शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}शिरूरच्या लेकीला पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचा मान मिळताच शिरूर शहरात आनंद, अभिमान आणि भावनिक वातावरण दाटून आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, यंदाचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होते. त्यामुळे या पदासाठी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर शिरूरची कन्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी निवड होताच शिरूरकरांचा ऊर अभिमानाने भरून आला.







