Uncategorizedविशेषशैक्षणिक

सूर्योदय कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘न्यूट्रिशनल डे’ उत्साहात

शिरूर  { डेली न्यूज पोस्ट सूर्योदय कॉलेज ऑफ नर्सिंग, शिरूर येथे प्रथम वर्षाच्या (बॅच २०२५-२६) विद्यार्थ्यांसाठी ‘न्यूट्रिशनल डे’ उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात आयोजित करण्यात आला. संतुलित आहार, पोषणमूल्ये, आरोग्यदायी आहारपद्धती आणि पोषणविषयक जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी विविध डायटची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केली. या प्रात्यक्षिकाचे परीक्षण महाविद्यालयाच्या संचालक वर्षा फक्कडराव काळे,प्रा.
सतिश धुमाळ, प्रशांत थोरात, सचिन शेळके, प्रतीक्षा सटाले आणि राजू शेख यांनी केले.

प्राचार्य तुषार दादाभाऊ थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, नर्सिंग विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेसोबतच समाजात योग्य आहार व पोषणाबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पौष्टिक खाद्यपदार्थ, संतुलित आहार, विविध आजारांनुसार आहारपद्धती तसेच आहाराचा आरोग्यावर होणारा परिणाम यांचे सादरीकरण केले. प्रत्यक्ष उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोषणशास्त्राचे ज्ञान अनुभवाधारित पद्धतीने समजून घेण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन प्राचार्य प्रा. तुषार थोरात, वृषाली शिंदे आणि विशाल दातीर, निखिल शिंदे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘सुदृढ आरोग्यासाठी योग्य पोषण हीच पहिली पायरी’ हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

oplus_131106

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button