राष्ट्रीय

शिरूरमध्ये अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी TOT प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम 24}
शिरूर येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या TOT (ट्रेनिंग ऑफ टीचर्स) प्रशिक्षण उपक्रमाचा यशस्वी समारोप रविवारी झाला. होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन व एकात्मिक बाल विकास योजना (ICDS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रशिक्षणात जीवन कौशल्य शिक्षण, बाल संरक्षण, निरोगी व सृजनशील उपक्रम, तसेच कला व कौशल्य विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण काळात अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिळालेल्या प्रशिक्षणाचा प्रभावी वापर करून प्रत्येक अंगणवाडीत मुलांसाठी आनंददायी व चाईल्ड फ्रेंडली उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या समारोप कार्यक्रमास स्पेन येथील परदेशी पाहुण्या रोसिया यांनी विशेष उपस्थिती लावून प्रशिक्षण प्रक्रियेचे निरीक्षण केले. त्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
हा उपक्रम होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. कॅरोलिन डी होल्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी शकील शेख, शिक्षण व समुदाय मॅनेजर वैशाली पवार, अंगणवाडी सुपरवायझर संगीता ठाकूर, तसेच चाईल्ड फ्रेंडली फॅसिलिटेटर सोफिया बाप्टिस्ट व कोमल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
शिरूर तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडी चाईल्ड फ्रेंडली बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, भविष्यातही असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button