Uncategorizedराजकीयराष्ट्रीयविशेष
Check Also
Close


शिरूर {डेली न्यूज पोस्ट २४,}उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या व तीन माजी आमदार यांच्या घरातील उमेदवारांमुळे या आमदारांची निवडणुकीला पणाला लागलेली प्रतिष्ठा या पार्श्वभूमीवर झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारत जिल्हा परिषदेच्या सात पैकी ४ जागा मिळविल्या व व पंचायत समितीला ८ इतक्या जागा प्राप्त करून राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर केला.
भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मागील वेळेस सात पैकी एकही जागा जिंकली नव्हते. यंदा मात्र ३ जागा मिळवत आपली ताकद वाढवली . भाजपाचे दिवगंत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई पाचर्णे यांचा पराभव हा पक्षाला जिव्हारी लागणारा आहे .
अवघ्या 56 मतांनी पाचर्णे यांच्या निसटत्या पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या ७ जागा करिता २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ जागासाठी ४६ उमेदवार निवडणुक रिंगणात होते.. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या काही गट व गणात भाजप व राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली . तर काही ठिकाणी दोन्ही शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी,अपक्ष अशी पंचरंगी लढत झाली.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार माजी सभापती मोनिका हरगुडे यांचा व सीमा कळमकर अपक्ष अशी लढत झाली. या लढतीत हरगुडे यांनी तब्बल 23 हजारहून अधिक मतांनी बाजी मारली.मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दादापाटील फराटे यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या नावाने या गटात उमेदवारी कायम ठेवली होती. माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी माजी सभापती सुजाता पवार या राष्ट्रवादीकडून तर भाजपाकडून सरपंच सचिन शेलार मैदानात होते.तर शिवसेना ठाकरे गटाचे मच्छिंद्र गदादे मैदानात होते. या चुरशीच्या लढतीत सुजाता अशोक पवार विजयी झाल्या. त्यांनी दादा पाटील फराटे यांचा पराभव केला विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद गटातून पवार यांचा झालेला विजय हा माजी आमदार अशोक पवार यांचे राजकारणातील जोरदार कमबॅक मानले जात आहे. माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांनी भाजप मध्ये प्रवेश करून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केली होती..सहा दशकाहून अधिक काळ माजी आमदार पोपटराव गावडे यांचे या जिल्हा परिषद गटावर एक हाती वर्चस्व आहे. या जिल्हा परिषद गटात चौरंगी लढत झाली या लढतीत भाजपचे राजेंद्र गावडे यांनी बाजी मारली. सहा दशकात या जिल्हा परिषद गटात प्रथमच कमळ फुलले आहे गावडे यांच्याबरोबर या गटातील दोन्ही पंचायत समितीतही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.तळेगाव – रांजणगाव सांड्स जिल्हा परिषद गटातून रेखा मंगलदास बांदल राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवार होत्या.या ठिकाणी दिपाली गव्हाणे या भाजपा कडून तर सारिका करपे (शिवसेना शिंदे ) रेश्मा जयेश शिंदे ( अपक्ष ) म्हणून उभे होते. जयेश शिंदे हे भाजपाचे नेते असून त्यांच्या पत्नी अपक्ष म्हणून उभे असल्याने या ठिकाणी रंगतदार लढत झाली. या लढतीत भाजपाच्या दिपाली गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा बांदल यांचा पराभव केला. हा पराभव मंगलदास बांदल यांना मोठा धक्का मानला जात आहे.
विजयी झालेल्या दिपाली गव्हाणे वडगाव शेरी चे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या आहेत. रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटात सर्वाधिक 81 टक्के मतदान झाले होते या ठिकाणी भाजपाच्या स्वाती पाचुंदकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती मानसिंग पाचुंदकर यांच्यात थेट झाली. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी स्वाती पांचुदकर व व माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर दादा पाचुंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
या लढतीत भाजपच्या स्वाती पाचुंदकर यांनी बाजी मारली. त्याचबरोबर या गटातील दोन्ही पंचायत समिती गणात ही भाजपचे उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेला हा जिल्हा परिषद गट होता येथील लढत हाय व्होल्टेज ही मानली जात होती.पाबळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल शिवले व भाजपाचे विकास गायकवाड यांच्यात थेट लढत झाली.
या लढतीत प्रफुल्ल शिवले यांनी सुमारे १९ हजाराहून अधिक मतांच्या फरकाने बाजी मारली.


