स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचे सांघिक विजेतेपद व फिरता चषक ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर यांनी पटकविला.
इयत्ता पाचवी ते सातवी वयोगटातील स्पर्धेत आर एम डी इंग्लिश स्कूलची नक्षत्रा पटवर्धन हिचा प्रथम क्रमांक. इयत्ता आठवी ते नववी वयोगटातील स्पर्धेत जीवन विकास मंदिर शाळेतील विद्यार्थी शिवम कोतवाल याचा प्रथम क्रमांक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचेसांघिक विजेतेपद व फिरता चषक ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर यांनी पटकविला.
तर इयत्ता पाचवी ते सातवी वयोगटातील स्पर्धेत प्रथम क्रमांक रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या नक्षत्रा पटवर्धन हिने तर इयत्ता ८वी ते ९ या वयोगटातील स्पर्धेत जीवन विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थी शिवम सोमनाथ कोतवाल यांचा आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पसायदान संस्था व डेक्कन इंग्लिश मिडीयम स्कुल शिरूर यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचे सांघिक विजेतेपद ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर यांनी मिळवले.
इयत्ता ५ वी ते ७ वी गटातील निकाल पुढीलप्रमाणे —
प्रथम : नक्षत्रा निषाद पटवर्धन{ रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कुल शिरूर )
द्वितीय : साक्षी अशोक बडे (ज्ञानगंगा विश्व् विद्यालय )
तृतीय : कांदबरी मयूर नरवडे (डेक्कन इंग्लिश स्कुल शिरूर )
या स्पर्धेचे परीक्षण माजी मुख्याध्यापक व्हि.डि. कुलकर्णी, माजी शिक्षिका संध्या कुलकर्णी, रंगकर्मी विलास गोसावी, प्रा. सतीश धुमाळ यांनी केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण परीक्षक व डेक्कन स्कूलचे मुख्याध्यापक समीर ओंकार यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील बारा वर्षाहून अधिक काळ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या निमित्ताने शिरूर परिसरातील विदयार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
व स्पर्धकांनी अधिकाधिक विविध विषयावरील पुस्तकांचे वाचन चिंतन मनन करावे असे आवाहन करण्यात आले.