Uncategorized

शिरूर येथे गणेश मंडळानी ऐतिहासिक, पौराणिक आणि प्रबोधनात्मक विषयावर केलेले देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी


शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर शहर आणि परिसरातील गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक प्रबोधनात्मक विषयांवरील देखावे सादर करण्यात आले असून, विविध मंडळांच्या कल्पक सजावटींमुळे शहरातील गणेशोत्सवाला विशेष रंगत आली आहे.

oplus_131074
oplus_131074

शहरात भव्य आणि दिव्य देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या रसिकलाल धारिवाल आडत बाजार गणेश मित्र मंडळाने ‘छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ’ हा भव्य ऐतिहासिक देखावा साकारला आहे. देखाव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहे.

कापड बाजार मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट केली आहे. आखिल रामआळी गणेश मित्र मंडळाने ‘श्रीकृष्ण’ या पौराणिक विषयावर आधारित देखावा साकारला आहे. हनुमान गणेश मित्र मंडळ, मारुती आळीने ‘त्रिटिका राक्षसिणीचा वध’ हा भव्य पौराणिक प्रसंग देखाव्यातून उभा केला आहे.

oplus_131074
oplus_131074

श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाने आकर्षक गणेश मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. पूर्वमुखी हनुमान गणेश मित्र मंडळ, सोनार आळीने आकर्षक सजावट केली आहे. श्रीमंत अष्टविनायक राजा गणेश मित्र मंडळ ट्रस्ट, गोपाळवस्तीने ‘श्री महाकाल भस्म आरती’ हा उज्जैनच्या धार्मिक परंपरेवर आधारित भव्य देखावा साकारला आहे. महाकाल मंदिरातील भस्म आरतीचे दृश्य साकारल्याने हा देखावा भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत असून, तो पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

oplus_131106

गोपाळ मोठी तालीम गणेश मित्र मंडळाने बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. कुंभार आळी गणेश मित्र मंडळाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारा ‘चेटूकवाडी’ हा प्रबोधनात्मक देखावा सादर केला आहे. मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून करण्यात आला आहे.

oplus_131074
oplus_131122
oplus_131074
oplus_131074

हनुमान गणेश मित्र मंडळ आणि महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळाने ‘पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग देखाव्यातून साकारला आहे. स्वराज्यासाठी बाजीप्रभूंनी केलेल्या पराक्रमाचे दर्शन घडविणारा हा ऐतिहासिक देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सरदार पेठ गणेश मित्र मंडळाने ‘नवनाथ’ या नाथ संप्रदायाशी संबंधित धार्मिक विषयावर आधारित देखावा सादर केला आहे. छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळाने ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ हा धार्मिक देखावा साकारला असून, त्यातील खंडोबा देवाची भव्य मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहे. मुंजोबा जवान गणेश मित्र मंडळ, भाजी मडई यांनी ‘शिवशंकर’ यांचा देखावा सादर केला आहे.

 विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ लाटेआळी यांनी ही आकर्षक अशी सजावट केले असून विविध उपक्रमांचे आयोजन गणेशोत्सवात केले आहे

याशिवाय आझाद सोशल क्लब, लाटेआळी; आझाद हिंद गणेश मित्र मंडळ, सुभाष चौक; स्टेट बँक कॉलनी मित्र मंडळ; छत्रपती संभाजी गणेश मित्र मंडळ, संभाजीनगर (हुडको कॉलनी); हनुमान गणेश मित्र मंडळ, जोशीवाडी; गुजर कॉलनी गणेश मित्र मंडळ; त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ, रेव्हन्यू कॉलनी आणि अजिंक्य तारा गणेश मित्र मंडळ यांनीही आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे.

ऐतिहासिक शौर्यकथा, पौराणिक प्रसंग, धार्मिक परंपरा आणि सामाजिक प्रबोधन अशा विविध विषयांमुळे यंदाच्या गणेशोत्सवातील देखावे भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. सायंकाळनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली आहे.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या दिवसांत अद्याप वरुणराजाने जोरदार हजेरी न लावल्याने भाविकांकडून “बाप्पा, वरुणराजाला बरसू दे” अशी प्रार्थना केली जात आहे. विविध गणेश मंडळांकडून आता विसर्जन मिरवणुकीसाठीच्या देखाव्यांचीही तयारी सुरू झाली असून, आगामी दिवसांत शिरूरचा गणेशोत्सव आणखी रंगतदार होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button