शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात मानवी जाणीव, नैतिकता, संस्कृती आणि मूल्यविचारांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. त्यामुळे मानव्यविद्याशाखा ही केवळ ज्ञानशाखा नसून तंत्रज्ञान आणि मानवी मूल्यांमधील महत्त्वाचा सेतू आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. प्रभाकर देसाई यांनी केले.
चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज’ तसेच महाविद्यालयीन स्तरावरील ‘आविष्कार’ स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी (दि. २२) झाले. यावेळी डॉ. देसाई उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित व संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. विनायक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. देसाई यांनी मिशेल फुको यांच्या ‘Panopticism’ आणि ‘Archaeology of Knowledge’ या संकल्पनांचा संदर्भ देत आधुनिक संस्था ज्ञान, विचार आणि मानवी वर्तनावर कशा प्रकारे प्रभाव टाकतात, याचे विवेचन केले. बहुशाखीय आणि आंतरशाखीय शिक्षणातील फरक स्पष्ट करताना विविध


जपण्यासाठी मानव्यविद्याशाखेची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.





