Uncategorized

बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी चिमुकल्यांसह पालकही सरसावले ‘कॉपेटिशन टू प्लीज बाप्पा ’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; लाडू, मोदक व गणेशचित्रांनी रंगले शालेय वातावरण


शिरूर,{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस.एस.पी.एम.च्या आर.एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉपेटिशन टु प्लीज बाप्पा ’ या अभिनव स्पर्धेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमुकल्यांसोबत त्यांच्या मातांनीही उत्साहाने सहभागी होत गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

बांधकाम व्यवसायिक संदिपशेठ बिहाणी यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नर्सरी वर्गासाठी लाडू बनविणे, सीनियर केजीसाठी मोदक बनविणे, तर ज्युनिअर केजीसाठी पालकांनी गणपती बाप्पाचे चित्र काढायचे आणि मुलांनी त्यात रंग भरायचे, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्युनिअर केजीतील पालकांनी साकारलेल्या गणेशचित्रांना चिमुकल्यांनी रंगांची उधळण करीत आकर्षक रूप दिले. आई आणि मुलांनी एकत्रितपणे केलेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
नर्सरीतील पालकांनी विविध प्रकारचे लाडू तयार करून सादर केले. सीनियर केजीच्या मोदक बनविण्याच्या स्पर्धेचे परीक्षण नीता सतिजा आणि मंजुश्री थोरात यांनी केले. मोदकाची चव, वापरलेले साहित्य आणि सादरीकरण या निकषांवर त्यांनी परीक्षण केले.
या वेळी शाळा समितीचे अध्यक्ष शिरीषकुमार बरमेचा, सदस्य राजेंद्र दुगड, विद्याधाम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे, विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक वनवे, पर्यवेक्षिका सुरेखा रणदिवे तसेच पर्यवेक्षक देविकर उपस्थित होते.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, सचिव नंदकुमार निकम, चेअरमन शिरीषकुमार बरमेचा आणि शाळेच्या प्राचार्या अश्विनी घारू यांनी पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका प्रिती सोनवणे तसेच सर्व शिक्षिकांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button