Uncategorized
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत एआय तंत्रज्ञानावर भर देणार : किशोर राजे निंबाळकर
रयत शिक्षण संस्थेच्या सचिव पदी निवड झाल्यावर शिरूर येथील डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निंबाळकर यांनी केले अभिवादन

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम,-24}
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्या बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता व बदलते तंत्रज्ञान या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्या संदर्भात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोर राजे निंबाळकर शिरूर येथे म्हणाले.
-

रयत शिक्षण संस्थेच्या सचिव पदी किशोर राजे निंबाळकर यांची निवड झाली आहे निवड झाल्यानंतर शिरूर शहरात आल्यानंतर शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
यावेळी रयत शिक्षण कौन्सिलचे सदस्य जाकिरखान पठाण, ज्येष्ठ विधीज्ञ डॉ . सुधाकर आव्हाड, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा, त्याचबरोबर रयत शाळा शिरूर चे मुख्याध्यापक संजय मचाले, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक,
मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, पांडुरंगा थोरात, श्रेणिक नहार, प्रा. शशिकांत जाधव, उदय शिंदे,डॉ. अतुलकुमार बेंद्रे, राळेगण सिद्धी येथील विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलिप देशमुख,आदी उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले की संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व विश्वस्त यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल त्या सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
यावेळी निवडीबद्दल किशोरराजे निंबाळकर यांचा रयत शाळा शिरूर यांच्या वतीने सन्मान करण्यात आलायावेळी जाकिरखान पठाण रवींद्र धनक यांची मनोगते झाली.
प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय मचाले यांनी केले.