Uncategorized

शिरूरमध्ये बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर ‘सांज दीपावली’ संगीतमय मैफलीचे आयोजन

ओंकार संगीत विद्यालयाच्या कलाकारांकडून जुन्या-नव्या हिंदी गीतांची सुरेल मेजवानी

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त शिरूर येथील गणेश मराठे संचलित ओंकार संगीत विद्यालयाच्या वतीने ‘सांज दीपावली २०२६’ या संगीतमय मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत बाबुरावनगर येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात हा सुरेल कार्यक्रम रंगणार आहे.

या मैफलीत ओंकार संगीत विद्यालयाचे कलाकार जुन्या आणि नव्या हिंदी चित्रपटगीतांचे सादरीकरण करणार असून, रसिकांना गीत-संगीताची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे. शिरूरमधील स्थानिक कलाकारांसोबतच अहिल्यानगर येथील प्रसिद्ध तबला व ढोलकीवादक अजित गुंदेचा आणि सिंथेसायझरवादक दिलावर यांची साथसंगत लाभणार आहे. तसेच अहिल्यानगर येथील अत्याधुनिक ध्वनियंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी पी. एन. गाडगीळ अँड सन्स हे प्रायोजक असून, डेक्कन स्कूल, शिरूर आणि समर्थ सेवा मंडळ, शिरूर हे सहआयोजक आहेत.

संगीतप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेली ही मैफल सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे. शिरूर व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल दीपोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक गणेश मराठे, डेक्कन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर ओंकार आणि समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष व्ही. डी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button