विशेष

शिरूरमध्ये ‘शिरूर वाचन’ उपक्रमाला आजपासून सुरुवात; पुस्तकदानासाठी नागरिकांना आवाहन! २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पुस्तक संकलन; वाचनसंस्कृती समृद्ध करण्यासाठी विविध संस्थांचा पुढाकार

शिरूर :{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शहरातील वाचनसंस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘शिरूर वाचन’ या भव्य पुस्तकदान व पुस्तक संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी आपल्या घरातील वाचून झालेली पुस्तके दान करून या ज्ञानदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

घराघरांत अनेक पुस्तके वाचून झाल्यानंतर कपाटात पडून राहतात. हीच पुस्तके गरजू विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, ऐतिहासिक पुस्तके तसेच लहान मुलांची गोष्टींची व चित्रांची पुस्तके नागरिकांनी दान करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत पुस्तक संकलनासाठी शहरातील तीन ठिकाणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये शिरूर रिक्रिएशन क्लब आणि लायब्ररी, राम आळी, माधव स्टोअर्ससमोर, शिरूर येथे नागरिकांना पुस्तके जमा करता येणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पुस्तक संकलन केले जाणार आहे.

या उपक्रमासाठी शिरूर रिक्रिएशन क्लब आणि लायब्ररी, मराठी विभाग चां. ता. बोरा महाविद्यालय, महाराष्ट्र साहित्य परिषद (शिरूर शाखा) आणि ‘वी लव्ह शिरूर’ यांनी पुढाकार घेतला आहे.

अधिक माहितीसाठी तसेच पुस्तक संकलनाबाबत ९९६०९८४४७० आणि ७७९६०३९००९ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘चला, एकत्र येऊया… शिरूरला वाचतं करूया!’ या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम शहरात वाचनाची आवड वाढविण्यासोबतच पुस्तकांचा पुनर्वापर आणि ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button