Uncategorizedराष्ट्रीयविशेष
Uncategorizedराष्ट्रीयविशेष


माजी आमदार काकासाहेब पलांडे , ॲड . अशोक पवार ,भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष राहूल पाचर्णे , बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रशेखर पाचुंदकर , बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम , विकास लंवाडे , उषादेवी बढे , पांडुरंग थोरात , विठ्ठल घावटे , प्रकाश थोरात आदी उपस्थित होते .
उद्योग मंत्री डॉ .उदय सामंत म्हणाले की शेतक-यांचा संदर्भात कोणी मनमानी करत असेल तर त्याला चाप लावला जाईल .आज या परिसरात भेट देण्यासंदर्भात आलो असता कंपनीने तात्पुरती डागडूजी केल्याच लक्षात येते . औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रदूषणा वर निर्णायक भूमिका घेण्यात येईल . कंपनीचा प्रदूषणा संदर्भातील सॅपल लॅब मध्ये बदलले जातात . आगामी काळात याबाबत दक्षता घेण्यात येईल . कंपनीचा पदूषणामुळे परिसरातील शेतजमिनी , जनावरे , पाणी याचे जे नूकसान झाले . त्यासंदर्भात कंपनीस नूकसान भरपाई देण्यास सांगू असे आश्वासन त्यांनी दिले .
शरद पवार म्हणाले की कंपनीच्या प्रदूषणाचा परिणाम पाणी, जमिन , पीक , जनावर यांच्यावर होत आहे . जमिनीचा पोत बिघडत आहे . निमगाव भोगी सह परिसरातील अन्य गावात कंपनीचा प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुंबई येथे पर्यावरण व उद्योग मंत्री यांची बैठक होत असून या बैठकीस आपण हजर राहणार आहोत. या कंपनीसाठी नव्याने देण्यात आलेली जमीन एमआयडीसीने रद्द करावी व शेती जनावरे जमिनीचे चे नूकसान झाले आहे त्याची नूकसान भरपाई कंपनीने एकरी द्यावी अशी मागणी पवार यांनी केली . शेत जमिन उध्वस्त झाली तर जगायचे कसे. जिथे शेती उध्वस्त झाली त्या शेत जमिनीचा मालकांना एकरी नूकसान भरपाई द्यावी अशीही मागणी पवार यांनी केली या विषयात राजकारण नको असे ही आवाहन त्यांनी केले .

