Uncategorizedराष्ट्रीय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिरूर येथील श्रीराम शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24 }राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिरूर येथील श्रीराम शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात होते या कार्यक्रमात आंबेडकर चळवळीचे अभ्यासक व विचारवंत ॲड. क्षितिज गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. प्रास्ताविक नगरसेवक उमेश शेळके यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय सुधाकर उर्फ नाना पोटे यांनी करून दिला. यावेळी संघाचे स्वयंसेवक, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्यानात बोलताना गायकवाड म्हणाले की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विशाल महासागरा सारखे आहेत . त्याचे कार्य हे सर्व समाजासाठी होते. त्यांच्या विचारांना जाणून घ्या असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास शिरूर तालुक्याचे माजी संघचालक दत्तात्रेय उर्फ मामा धोंगडे, तालुका माजी संघचालक दत्ताजी कोळपकर, पुणे जिल्हा सहकार्यवाह सुरेश पडोळे, भारतीय किसान संघाचे सूर्यकांत शिर्के आदी उपस्थित होते. संपत लोखंडे यांनी सांघिक गीत सादर केले,
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब बेंद्रे यांनी केले.व्याख्यानानंतर शिरूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


