आनंद नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आठ जणांना अटक
शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24 टीम }: आनंद नागरी सहकारी पसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिरूर पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.
शिरूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 626/2024 अन्वये भारतीय दंड विधान कलम 420, 409, 467, 468, 471, 120(ब), 34 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात विनयकुमार वसंतलाल संघवी वय 48 वर्ष भरतकुमार रतनलाल चोरडीया वय 56 वर्षे , मनोज पोपटराव मुसुडगे वय 50 वर्षे, वल्लभ मनसुखलाल साखला वय 38 वर्षे , व सुरेशकुमार शांतीलाल बोरा वय 71 वर्षे , कांतीलाल बाळासो होळकर, वय 65 यांचा समावेश आहे.
या प्रकरणात द्वितीय अप्पर विशेष लेखापरीक्षक (वर्ग-२) सहकारी संस्था, पुणे येथील संजयकुमार सखाराम पुंडे (वय 56) यांनी पुरवणी जबाब दिला होता. या जबाबात संबंधित आरोपींचा गैरव्यवहारात सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तपासादरम्यान आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अधिक तपास सुरू आहे.