Uncategorizedराष्ट्रीय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन



महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अकोला येथील प्रा.श्रीकांत बरिंगे यांच ‘ शिवराय ते भीमराय ‘ या विषयावर व्याख्यान झाले. त्याच बरोबर सिद्धार्थ मोरे यांचे ‘मी जोतीराव फुले बोलतोय ‘ हे नाटक झाले. कवी सुमंत गुणवंत कवियत्री रमणी आकाश व इतर सहकारी पुणे यांचे कवी संमेलनही पार पडले.
.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे, तहसिलदार बाळासाहेब म्हस्के, यांच्यासह उत्सव समितीचे अध्यक्ष रामभाऊ झेंडे, प्रमोद गायकवाड,मुख्याध्यापक सुनील थोरात, सचिन जाधव, विनोद शिंदे, रश्मी अहिरे,शरद उघडे, मायाताई दामोदर,
माजी नगरसेवक विनोद भालेराव ,रमेश गायकवाड ,ॲड .माया गायकवाड , शरद गायकवाड , बबन गायकवाड , मुख्याध्यापक संजय वाघ, प्रा. रतनकुमार ससाणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, यांच्या सह आजी माजी नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते . याच कार्यक्रमात मुख्याध्यापक सुनील थोरात यांच्या, ‘ नातं मनामनाचे ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी आमदार अशोक पवार व नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सूत्रसंचालन माजी नगरसेविका माया गायकवाड हिमांशू गायकवाड यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुनील थोरात यांनी मानले. मोफत हृदयविकार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

