Uncategorizedराष्ट्रीयविशेष

पानसरे हॅपिनेस अँड वेलनेस सेंटरचे भूमिपूजन जगप्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते संपन्न ; आरोग्यसेवेसोबत पर्यटनाची ही सुविधा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि वाढते शहरीकरण यामुळे नव्या व्यवसाय संधी निर्माण होत असून पानसरे हॅपिनेस अँड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष तथा उद्योगपती प्रकाश धरिवाल यांनी व्यक्त केला.
शहरालगत घोडनदी किनाऱ्यावरील पानसरे फार्म्स येथे या आरोग्य व पर्यटन केंद्राचे भूमिपूजन धरिवाल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संतोष पानसरे, मध्यकांत पानसरे, कांचन पानसरे, पोलीस उपाधीक्षक अनिल कटके, उपनगराध्यक्ष मितेश गादिया, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे शिरीष बरमेचा,भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे, नगरसेवक अभिजित पाचर्णे, सागर नरवडे, निलेश पवार,डॉ. राहुलदत्त पाटील डॉ. धीरज सुराणा डॉ. सतीश आंधळे उदय शिंदे, रुपेश संघवी आदी सह उद्योग, व्यवसाय, सामाजिक व राजकीय , शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
धरिवाल म्हणाले, दिवंगत उमाजी पानसरे आणि माझे वडील दिवंगत रसिकलाल धरिवाल यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. ही मैत्री पुढील पिढीतही कायम राहिली आहे. शिरूर शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उद्योग-व्यवसायासाठी नवे पर्याय उपलब्ध होत असून या वेलनेस सेंटरमुळे आरोग्य व पर्यटन विषयक सुविधा अधिक सक्षम होतील.
प्रास्ताविकात मध्यकांत पानसरे यांनी सांगितले की, सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे विविध आरोग्य समस्या वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर निसर्गोपचार पद्धतीद्वारे उपचार देण्याचा प्रयत्न या सेंटरमधून केला जाणार आहे. तसेच, येथे पर्यटनाचीही सुविधा विकसित केली जात असून सेंद्रिय शेती व देशी गायींचे पालन यावर भर दिला जात आहे.

कार्यक्रमाचे स्वागत संतोष पानसरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले, तर आभार कांचन पानसरे (कुटे ) यांनी मानले.

डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने प्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते राहुल उर्फ आप्पा बोथरा यांना 50 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button