Uncategorized

भांबर्डे व क्रांती मित्र मंडळ बो-हाडे मळा व मुक्ताई नगर मधील बी . के . सी स्कूल येथे शिवजयंती उत्सहात साजरी. बाल शिवव्याख्याती सृष्टी श्यामकांत वर्पेचे व्याख्यान

बो-हाडे मळा येथे शिवजयंती निमित्त अभिवादन करताना चेअरमन आप्पाजी वर्पे

शिरुर : (डेली पोस्ट न्यूज टीम) छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेले पराक्रम , राजनीति, प्रशासन, शिलकीचा अर्थसंकल्प आणि महाराजांच्या काळातील सुराज्य या सर्व प्रकारांचा अभ्यास केजी ते पीजी या वर्गात असला पाहिजे असे मत मुख्याध्यापक मारुती कदम यांनी शिवजयंती निमित्त व्यक्त केले.

भांबर्डे (ता. शिरूर ) येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन, न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दोन्ही शाळेच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. विविध वेषभूषा परिधान करून विद्यार्थी जोशपूर्ण घोषणा देत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्याध्यापक मारुती कदम मुख्याध्यापक नानाभाऊ नाणेकर आणि कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन चे समन्वयक चेतन डांगे यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले.
“आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची सुधारणा घडवून आणणे, सामाजिक सलोखा राखणे, महाराजांचा गनिमी कावा, इ. सर्व गोष्टींवरून महाराजांच्या विवेकाचा आदर्श आजच्या पिढीने घेतला पाहिजे. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांनी जनतेला बाल हक्कांबद्दल जागृत केले. ‘बालमजुरी बंद करा. शिक्षणाला प्रोत्साहन द्या. बालविवाह थांबवा भविष्य घडवा, बेटी बचाव -बेटी पढाव, छत्रपती शिवाजी महाराज की जय.’ अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.” या कार्यक्रमासाठी
कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन चे समन्वयक चैतन्य डांगे ,
अलका काळे, अश्विनी संकपाळ, सुरेश शेळके, बाळासाहेब दिवेकर हे सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगते झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम गाडे यांनी केले.

 

 

भाबर्डे येथे शिवजयंती निमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापक मारुती कदम 
भाबर्डे येथे शिवजयंती निमित्त अभिवादन करताना मुख्याध्यापक मारुती कदम                                                                   बोऱ्हाडे मळा येथे क्रांती तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी शिरुर सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब वर्पे यांच्या हस्ते शिवछत्रपतींना पुष्पहार घालून आणि ज्योत प्रज्वलित करून शिवगर्जनांच्या जयघोषात शिवजयंती उत्सवाची सुरुवात झाली .सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन मंडळाच्या मार्फत करण्यात आले. अनेक चिमुकल्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. पोवाडे, शिवगीते, शिवकालीन प्रसंग, वेशभूषा, साहसी खेळ असे कार्यक्रम झाले. सर्व सहभागी चिमुकल्यांना बक्षिस वाटप करण्यात आले .कार्यक्रमास आखिल भारतीय मराठा महासंघाचे शामकांत वर्पे, सभासद श्री. गणेश किसन वर्पे, श्री. संतोष बोऱ्हाडे, श्री. गणेश रमेश बोऱ्हाडे, उपस्थित होते.मंडळाचे चेतन बोऱ्हाडे, प्रदीप वर्पे, राहुल वर्पे, श्री. आदित्य बोऱ्हाडे, .विशाल वर्पे , आदेश वर्पे, अक्षय वर्पे,अक्षय बोऱ्हाडे, आकाश बोऱ्हाडे, अजित सूर्यवंशी, केतन बोऱ्हाडे आणि अमित वर्पे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते .

शिरूर च्या मुक्ताईनगर येथील बी .के. सी. इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अध्यक्ष सुनिल उर्फ दादा चौधरी यांच्या हस्ते छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या प्रतिमेचे  पूजन आणि आरती करून ” जय भवानी जय शिवाजी ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” च्या जयघोषात आणि उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. महिला पालकांनी पारंपारिक तर विद्यार्थ्यांनी महाराज , जिजाऊ आणि मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती.पालक डॉ.स्वाती बच्छाव यांनी महाराजांच्या पराक्रमावर आधारीत पोवाडा तर शिक्षिका पल्लवी तांबे यांनी लेझिम नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सांगता सूरज पोकळे याच्या व्याख्यानाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन  प्रियांका काळे , पल्लवी तांबे , सुहानी शिंदे , मंगल कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन सचिव मनीषा चौधरी यांनी केले.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button