Uncategorized

नवरात्रीनिमित्त शिवरत्न प्रतिष्ठानचे उद्योजक संतोष थेऊरकर यांच्या वतीने भाविकांसाठी देवदर्शन सहल

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम _२४}स्टेट बँक कॉलनी, जोशी वाडी व विठ्ठल नगर परिसरातील १५० हुन अधिक स्त्री पुरुष भाविकांसाठी शिव रत्न प्रतिष्ठान व बालाजी डेव्हलपर्सचे संतोष थेऊरकर यांनी देवदर्शन सहलीचे आयोजन केले होते.

चार गाड्या मधून हे भाविक रवाना झाले. तुळजापूर येथील तुळजा भवानी माता, अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ व पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर आदी ठिकाणी भाविक जाणार आहेत.

oplus_131074
नवरात्रीच्या काळात नारी शक्तीला वंदन व सन्मान करण्याचा हेतुने देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक संतोष थेऊरकर यांनी सांगितल.
ह. भ. प. संभाजी महाराज दरोडे  म्हणाले की संतोष थेऊरकर हे सातत्याने विविध समाजिक व धार्मिक उपक्रम राबवून समाजाची सेवा करत असतात. थेऊरकर हे  समर्पित व सेवाभावी वृत्ती चे युवा नेतृत्व असल्याचे ते म्हणाले.
उद्योजक व कर्डीलेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवनाथ फरगडे, सेवानिवृत्त कॅप्टन प्रभाकर थेऊरकर, माजी नगरसेवक अशोक पवार, दादाभाऊ भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button