Uncategorizedविशेष

न्हावरा फाटा ,शिरुर येथील कानिफनाथ मंदिरात रंगपंचमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी . १० हजाराहून आधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ .

कानिफनाथ मंदिर , न्हावरा फाटा शिरुर
कानिफनाथ मंदिर न्हावरा फाटा , शिरुर

शिरुर  ( डेली न्यूज पोस्ट टीम 24 )

न्हावरा फाटा , ता . शिरुर येथे शिरुर पंचक्रोशीचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. कानिफनाथ मंदिर येथे रंगपंचमी उत्सहात साजरी करण्यात आली . त्याच बरोबर रंगपंचमी निमित्त आयोजित यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी श्री. कानिफनाथ मंदिरात दर्शन घेतले .
फाल्गुन कृष्ण पंचमी रंगपंचमी निमित्त श्री . कानिफनाथ मंदिर ट्रस्ट घावटे मळाच्या वतीने दूध आणि पंचामृताचा अभिषेक व पूजा करण्यात आली .रोहित घावटे हे अभिषेक पूजेस बसले होते . त्यानंतर नाथांची आरती झाली रंगपंचमी व यात्रेनिमित्त कानिफनाथ मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट  करण्यात आली होती. सायंकाळ नंतर भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता काही वर्षापूर्वी पुणे अहिल्यानगर व शिरुर सातारा राज्यमहामार्गावरील कानिफनाथ मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आहे महामार्गावर असणारा हा मंदिरात सातत्याने भाविकांची वर्दळ असते . दर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक येत असतात .
रंगपंचमी व यात्रेनिमित्त कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट घावटे मळा , यांच्या वतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते . याही वर्षी १० हजाराहून आधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . पुण्यातून मढी येतील यात्रेकरिता जाणारे भाविक ही दर्शनासाठी व महाप्रसादासाठी आवर्जून येथे थांबले होते .सायंकाळी वाजत गाजत मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली . सरदवाडीतील मंदिरास प्रदक्षिणा मारुन मानाची काठी पुन्हा कानिफनाथ मंदिरात आणण्यात आली . ब्रॉस बॅन्ड पथक यांनी ही सुंदर अशी भक्तिगीतांचे सादरीकरण केले .
यात्रेकरीता पोलीस व गृहरक्षक दलाचा जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button