Uncategorizedक्रीडाराष्ट्रीय

प्रसिध्द उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारीवाल ( पीआरडी चषक ) क्रिकेट स्पर्धाच्या ११ व्या पर्वाचे विजेते तुकाई टायगर गृप पारगाव

इकोग्राम संघ शिक्रापूर व तुकाई टायगर गृप संघ पारगाव या दोन संघात अंतिम सामना अखेरचा षटका पर्यत रंगला अंतिम सामनासाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती

उद्योजक प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४ )
प्रसिध्द उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश रसिकलाल धारीवाल ( पीआरडी चषक ) क्रिकेट स्पर्धाच्या ११ व्या पर्वाचे विजेते ठरत प्रथम क्रमांक तुकाई टायगर गृप पारगाव यांनी पटकाविल्या . अखेरच्या चेंडू पर्यत श्वास रोखून धरायला लावणा-या अंतिम सामन्यात एक धावेने तुकाई टायगर गृप विजयी झाले . १ लाख २१ हजार रु रोख व ट्राफीचे बक्षीस या संघाने प्राप्त केले .
मागील सात दिवसापासून रयत शाळेच्या मैदानावर स्पर्धेच्या दिवस रात्र क्रिकेटच्या मॅचेस झाल्या . मागील ११ वर्षापासून माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे व त्याचे सहकारी या स्पर्धेचे आयोजन करत असतात .
रविवार दिनांक २३ मार्च रोजी स्पर्धेच्या उपांत्य फेरी व अंतिम फेरीचा सामना झाला . अंतिम सामना तुकाई टायगर गृप पारगाव व इकोग्राम संघ शिक्रापुर यांच्यात शेवटच्या चेंडू पर्यत रंगला . अंतिम सामन्यात प्रथम फलदाजी करताना तुकाई टायगर संघाने ६३ धावांचे आव्हान इकोग्राम संघाला दिले होते .
इकोग्राम संघाला ६१ धावा करता आल्या व अवघ्या १ धावेने पराभूत व्हावे लागले . अंतिम सामन्यात दोन्ही संघाने आपल्या अप्रतिम खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली . इकोग्रामचा स्टार खेळाडू रजत मुंडे व ओम माळी यांच्या खेळीने इकोग्राम संघास विजयाची संधी निर्माण झाली होती .
परंतु अखेरचा शेवटचा षटकात रजत मुंडे बाद झाला आणि सामनाचे चित्र बदलले . शेवटच्या षटका अगोदरचे गोलदांज विकास सुरवसे ने टाकलेले षटक ही निर्णायक ठरले .
शेवटच्या षटकात ६ चेंडु आणि १९ धावा विजयासाठी इकोग्राम संघाला लागत होत्या . अनिकेत ताकवणे हा गोलदांज शेवटचे षटक टाकण्यासाठी आला असता पहिल्या चेंडूवर ४ धावा आल्या दुस-या चेंडूवर षटकार खेचला गेल्या .
त्यानंतर तीसरा चेंडूवर १ धाव आली .
३ चेंडुत ८ धावा लागत असताना व मैदानात तडाखेबाज फलंदाज रजत मुंडे बॅटिंग करत असल्याने सामना इकोग्रामचा बाजूने झुकेल असे वाटत असताना अनिकेत ताकवणे ने टाकलेल्या चौथा चेंडू निर्धाव गेल्या . साहजिकच दोन चेंडूत ८ धावा असे समीकरण झाले .५ व्या चेंडूवर रजत मुंडे बाद झाले आणि तेथेच इकोग्रामचा पराभव निश्चित झाला . त्यानंतर आलेला फलंदाज क्षितीज दिवेकर यांनी उत्तुंग असा षटकार ठोकला . परंतु इकोग्राम संघाला पराभव स्वीकारावा लागला .
अंतिम सामना पाहण्यासाठी रयत शाळेच्या मैदानावरील प्रेक्षक गॅल-या खचाखच भरल्या होत्या. रविवार हा सुटीच्या दिवस असल्याने मोठी गर्दी प्रेक्षकांची सेमी फायनल व फायनलचा सामना पाहण्यासाठी झाली होती .प्रत्येक चौकार, षट्कार, विकेट ला प्रेक्षक उस्फूर्त दाद देत होते .ढोल ताश्याचा गजर होत होता .
आजच्या सेमी फायनल व फायनलचा सामनाकरीता माणिकचंद उद्योग समूहाचे प्रसिध्द उद्योगपती आदित्य प्रकाश धारीवाल , शिरुर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड . सुभाष पवार ,माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , स्पर्धेचे आयोजक माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रशांत शिंदे , माजी नगरसेवक राजेंद्र ढोबळे , व्यवसायिक श्रीनिवास परदेशी ,लायन्स क्लब शिरुरचे माजी अध्यक्ष राजेंद्र लोळगे , विजय ढोबळे आदी उपस्थित होते .
बक्षिस वितरण उद्योगपती आदित्य प्रकाश धारीवाल व माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांच्या हस्ते झाले .
स्पर्धेत चौथा क्रमांक – आमदार राहूलदादा कुल प्रतिष्ठान राहू ( संघ मालक – स्वप्ननील गायकवाड ) यांचा आला. त्यांना ५० हजार रुपये रोख व ट्राफीचे बक्षिस मिळाले . तृतीय क्रमांक व्ही सी सी संघ , मांडवगण फराटा ( संघ मालक एजाज बागवान ) यांचा आला . ७५ हजार रु . रोख व ट्राफी असे बक्षिस त्यांना मिळाले . दिवितीय क्रमांक – इकोग्राम संघ शिक्रापूर ( संघ मालक मोहन शेळके) यांचा आला त्यांना एक लाख रु व ट्राफीचे बक्षिस मिळाले .
प्रथम क्रमांक – तुकाई टायगर गृप पारगाव ( संघ मालक यशवंत पाचंगे ) यांचा आला .१ लाख २१ हजार रु . रोख व ट्राफी असे बक्षीस संघास मिळाले .
स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज किताब तुकाई टायगर गृप पारगावचा क्षितीज दिवेकर यास मिळाला .
बेस्ट बॅटसमॅन स्पर्धेत ७ सामनात १३५ धाव्या ठोकणारा इकोग्राम शिक्रापूर संघाचा रजत मुंडे ठरला . स्पर्धेत ७ सामना मध्ये १० विकेट घेणारे तुकाई टायगर गृप पारगावचे गोलदांज विकास सुरवसे बेस्ट बॉलर ठरले .
बेस्ट किपर म्हणून महाराणा प्रताप संघ मंचरचे सुशांत जाधव , बेस्ट कॅच रॉयल रायडर संघाचे निशांत जाधव यांना बक्षिस देण्यात आले . त्याच बरोबर चौकार ची हॅट्रीक करणारे इकोग्राम संघ शिक्रापूरचे स्वराज्य कामठे , सिक्सची हॅट्रीक करणारे महाराजा प्रतिष्ठान अण्णापूरचे संदिप कुरुंदळे , विकेट हॅट्रीक करणारे रॉयल रायडर संघ शिरुरचे सूरज गवळी यांना ही बक्षिसे देण्यात आली सेमी फायनलचे मॅन ऑफ द मॅच म्हणून तुकाई टायगर संघ पारगावचे विकास सुरवसे व इकोग्राम संघ शिक्रापूरचे रजत मुंडे यांना सन्मानित करण्यात आले .
या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम केलेले दीपक पिळगावकर , स्वप्ननील कपोले , विनायक पाटील , समालोचक प्रदीप ओव्हाळ , सागर ढवळे , रवींद्र जाधव ,
स्कोअर म्हणून काम पाहीलेले आकाश पवार यांचाही सन्मान करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button