राष्ट्रीय

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त शिरूर येथे अभिवादन

नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांमुळे महिलांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि आज त्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, असे प्रतिपादन शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्योती सावित्री जयंती उत्सव समिती, शिरूर यांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, सभापती डॉ. सुनीता पोटे, सभापती आयेशा सय्यद, नगरसेवक सागर नरवडे, नगरसेविका सुनीता भुजबळ, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रविंद्र सानप, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मिठू गदादे, राजेंद्र खेतमाळीस, रवि लेंडे, प्रवीण मुथा, आनंद भुजबळ, योगेश जामदार, राजू होले, बाळासाहेब झाडगे, राजेंद्र जाधव, बंडू जगताप, डॉ. वैशाली साखरे, गोपीनाथ पठारे, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाचर्णे म्हणाल्या, की कामाच्या माध्यमातून शिरूर शहर अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विचारांमुळे महिलांना समाजात सक्षमपणे उभे राहण्याची प्रेरणा मिळाली आहे. महापुरुषांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करत प्रत्येक पुरुषाने महिलांना प्रोत्साहन व सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र सानप यांनी केले. यावेळी सभापती डॉ. सुनीता पोटे, आयेशा सय्यद, संजय बारवकर, सागर नरवडे तसेच प्रा. सतीश धुमाळ, संजय बारवकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिठू गदादे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिबूब सय्यद यांनी मानले.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बाफना यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button