Uncategorized

शिरुर शहरातील घोडनदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधारातून पाण्याची गळती

गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी


शिरुर दिनांक ( वार्ताहर )
शिरुर शहराला पाणीपुरवठा केल्या जाणा-या हत्तीडोह येथील कोल्हापूर पध्द्तीच्या बंधा-यातून पाण्याची गळती होत असून ही पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे .
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद ,शिरुर प्रवासी संघाचे अनिल बांडे व संघटक अविनाश घोगरे यांनी शिरुर नगरपालिकेस निवेदन दिले आहे .शिरुर नगरपरिषदेच्या घोडनदीमधील हत्तीडोह बंधारात नुकतेच पाणी आले आहे . बंधारात पाणी आल्याने शिरुर शहराला दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नियमित दररोज करण्यात आला आहे . घोडनदीतील कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची सध्या गळती सुरु आहे.

गळतीच्या पाण्यामुळ लवकरच हा बंधारा खाली होण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल महित्यातच बंधारा रिकामा होतो की काय ? अशी भीति निर्माण झालेली आहे

.बंधारा रिकाम्या झाल्यावर शिरुरकर नागरिकाना भर उन्हान्यात म्हणजे मे महिन्यामध्ये पाण्यापासुन वंचित राहावे लागेल काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. युध्दपातळीवर बंधा-याची गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करावी जेणे करून शिरुरकरांना भर उन्हाळ्यामध्ये पाण्यापासून वंचित राहावे लागणार नाही असे निवेदनात म्हटले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button