Uncategorized

शिरूर नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा सहाव्या दिवशी 12 उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}: शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याचा सहाव्या दिवशी १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित जगताप व मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली. आता पर्यत एकूण २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्षपदासाठी एक ही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, माजी नगरसेवक विनोद भालेराव, भाजपा चे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, स्वप्ननील माळवे, शिवसेनेच्या सुप्रिया साकोरे, या प्रमुख उमदेवारी अर्ज दाखल केले आहेत.

वार्ड क्रमांक १ मधून अनिल गायकवाड,वार्ड क्रमांक ३ मधून केशव लोखंडे, वार्ड क्रमांक ४ मधून ऐश्वर्या साखला, वार्ड क्रमांक ७ मधून परशुराम मचाले,

वार्ड क्रमांक ८ ब मधून महिबूब सय्यद, वार्ड क्रमांक ८अ मधून वृषाली नीलेश नवले,वार्ड क्रमांक ९अ तून विनोद भालेराव,वार्ड क्रमांक १० मधून स्वप्ननील माळवे,वार्ड क्रमांक ११अ तून सुप्रिया साकोरे,

१२ अ मधून उमेश शेळके, अविनाश घोगरे,वार्ड क्रमांक १२ ब मधून नंदा जाधव, आदी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख सोमवार दिनांक १७ नोव्हे २०२५ अशी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button