क्राईमविशेष

घरातून निघुन गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा शोध घेवून  पोलीसांनी  त्यांना दिले पालकांच्या ताब्यात तसेच शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतुन मिसींग झालेल्या ४५ महिला व ३५ पुरुष यांचा शोध घेण्यात यश

शिरुर दिनांक ( डेली न्यूज पोस्ट टीम -२४)
शिरुर पोलीस ठाण्या हद्दीतून  मिसिंग झालेल्या १३ बालिकांसह  एकुण ४५ महीला व ३५ पुरुष यांचा शोध घेवुन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात शिरुर पोलीसांनी  दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली .
 शिरूर शहर तसेच पोलीस स्टेशन ह‌द्दीमधुन जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीमध्ये  अल्पवयीन बालिका घरामधुन निघुन गेल्याबाबतच्या वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुशंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे वेगवेगळे १३ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरच्या अल्पवयीन बालिकांबाबत दाखल गुन्हयांची गांभीर्यता व संवेदनशिलता लक्षात घेवुन पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे  यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस पथकाला सदरच्या अल्पवयीन बालिकांचा तात्काळ शोध घेणेबाबत सूचना दिल्या होत्या . त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषन व बातमीदार यांचेकडुन माहिती काढुन कसोशीने तपास करून आतापर्यंत शिरूर पोलीस स्टेशन ह‌द्दीमधील १३ अल्पवयीन बालिकांचा शोध घेवुन त्यांना सुखरूप त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिले आहे .
       तसेच शिरूर शहर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधुन महीला व पुरुष हे मिसींग असल्याबाबत तक्रारी दाखल होत्या. सदर मिसींग महीला व पुरूष यांचे मिसींगचा शोध पोलीस हवालदार संपत खबाले, पोलीस अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे, महीला पोलीस अंमलदार सारिका माळी यांच्या मिसींग शोध पथकाने घेवुन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिले आहे .
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली मिसींग पथकामधील अंमलदार यांनी एक महिन्याचे कालावधीमध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतुन मिसींग झालेल्या एकुण ४५ महीला व ३५ पुरुष यांचा शोध घेवुन त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिले आहे . 
हा  पोलीस अधिक्षक संदिप गिल , अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले , पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे  यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक  शुभम चव्हाण,, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार मोनीका वाघमारे, प्रतिभा देशमुख, स्नेहल होळकर, गोदावरी धंदरे, परवीण पप्पुवाले, गिता सुळे व मिसींग पथकाचे पोलीस हवालदार संपत खाबाले, पोलीस अंमलदार सोनाजी तावरे, आकाश नेमाणे, पवन तायडे, महीला पोलीस अंमलदार सारीका माळी यांचे पोलीस पथकाने केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button